1 एप्रिलपासून वीज मीटरही होणार प्रीपेड: रिचार्ज केल्यानंतरच मिळेल वीज - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०१ फेब्रुवारी २०२०

1 एप्रिलपासून वीज मीटरही होणार प्रीपेड: रिचार्ज केल्यानंतरच मिळेल वीज

नागपूर/ललित लांजेवार:
वीजचोरी रोखण्यासाठी केंद्र सरकार मोबाईलप्रमाणेच आता प्रत्येकाच्या घरातील वीज मीटरही प्रीपेड करणार आहे.1 एप्रिलपासून घरामध्ये प्रीपेड वीज मीटर लावणे बंधनकारक केले जाणार आहे.टप्प्याटप्प्याने जुने मीटर हटवण्यात येतील. त्याचप्रमाणे वीज पुरवठाही स्मार्ट मीटरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. वीजेचा दर निवडण्याचा पर्यायही ग्राहकाला असणार आहे.

2022 पर्यंत वीज मीटर प्रीपेड करण्याचं लक्ष्य पूर्ण करण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 2020-21 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. त्यामुळे घरामध्ये वीज हवी असल्यास रिचार्ज कराव लागणार, अन्यथा वीजपुरवठा बंद करण्यात येईल.


हा उद्देश साध्य करण्यासाठी 22 हजार कोटींची तरतूद केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

 वीज कंपन्यांचं होणारे नुकसान भरुन काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रीपेड वीज मीटर लावणे बंधनकार करण्यात येणार आहे. 
  साधारण 8 हजारांपासून ते 25 हजारांपर्यंत या प्रीपेड वीज मीटरची किंमत असणार आहे. या प्रीपेड वीज मीटरचा रिचार्ज मोबाईलद्वारे करता येणार आहे.