व्हॅलेन्टाईन्स विकच्या पहिल्याच दिवशी पोलिसांनी पोट्यायचा पिटला गेम - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०७ फेब्रुवारी २०२०

व्हॅलेन्टाईन्स विकच्या पहिल्याच दिवशी पोलिसांनी पोट्यायचा पिटला गेम

चंद्रपुर/ललित लांजेवार:
चंद्रपूर शहरात असलेल्या जनता कॉलेज परिसरातील रेणुका गेस्ट हाऊसमध्ये पोलिसांनी धाड टाकून १३ महाविद्यालयीन 13 जोडप्यांना पकडले आहे.रोज डे निमित्त चंद्रपूर येथील जनता कॉलेज चौकात असलेल्या एका गेस्ट हाऊसवर काही महाविद्यालयीन जोडपे असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.


त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रेणुका गेस्ट हाऊसवर पाळत ठेऊन आज धाड घातली,आणि 13 जोडप्यांना रंगेहात पकडलं, यात चंद्रपूर आणि लगतच्या परिसरातील 13 मुले व 13 मुली यात सापडल्या आहेत.या गेस्ट हाऊसचा मालक फरार झाला असून नोकराला अटक करण्यात आली.