नागपूरचा गँगस्टर संतोष आंबेकर याचा अनधिकृत बंगला नागपूर मनपाने केला जमीनदोस्त - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२५ फेब्रुवारी २०२०

नागपूरचा गँगस्टर संतोष आंबेकर याचा अनधिकृत बंगला नागपूर मनपाने केला जमीनदोस्त

Image result for santosh ambekar bungalow

नागपूर/प्रतिनिधी:
नागपूरचा कुख्यात गँगस्टर संतोष आंबेकर याचा अनधिकृत बंगला जमीनदोस्त केला नागपूर महानगरपालिकेच्या पथकाने जमीनदोस्त केला. 

शिस्तप्रियतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांनी हि  धडक कारवाई सुरु केली.या कारवाई नंतर अनेकांचे धाबे दणाणले.


तुकाराम मुंढे यांनी नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासूनच त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली आहे.याचाच एक कारवाई सपाटा शहरातील अनधिकृत कामाकडे मुंडे यांनी केला.
Image result for santosh ambekar bungalow
इतवारी परिसरात हा अनाधिकृत बंगला होता.नागपूर महानगरपालिकेने आंबेकरला कायदेशीर नोटीसही बजावली. मात्र, त्याने स्वतःहून अतिक्रमण हटवले नाही. यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी संबंधित बंगला जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले. 


video help:Z24 tass

गॅंगस्टर संतोष आंबेकरचा नागपूरमधील इतवारी अनाधिकृत बंगला होता. याबाबत नागपूर महानगरपालिकेने आंबेकरला कायदेशीर नोटीसही बजावली. मात्र, त्याने स्वतःहून अतिक्रमण हटवले नाही. यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी संबंधित बंगला जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे मनपाच्या पथकाने आज धडक कारवाई करत हा बंगला पाडला.
Image
नागपूरचे महापौर संदिप जोशी आणि महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अनधिकृत बांधकामावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. यावेळी परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.