चंद्रपूर:धक्कादायक:वाढदिवसाचा केक खाल्ल्याने 15 विद्यार्थिनींना विषबाधा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२९ फेब्रुवारी २०२०

चंद्रपूर:धक्कादायक:वाढदिवसाचा केक खाल्ल्याने 15 विद्यार्थिनींना विषबाधा

 
ललित लांजेवार/चंद्रपूर:
तुम्ही किव्हा तुमचे मुल वाढदिवसानिमित्य केक खात असाल तर विचार करून खा. कारण शाळेतील मैत्रिणींच्या वाढदिवसाचा केक
खाल्ल्याने 15 विद्यार्थिनींना विषबाधा झाली आहे. 

चंद्रपूर शहरातील बागला चौकात असलेल्या मुरलीधर बागला कॉन्व्हेंट शाळेत ही घटना घडली.एकून 15 विद्यार्थिनींना विषबाधा झाली आहे. यापैकी 6 विद्यार्थिनींना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.मुरलीधर बागला कॉन्व्हेंट शाळेतील सहाव्या ‘ब’ वर्गातील विद्यार्थिंनीनी वर्गातील दोन मैत्रिणींचा वाढदिवस वर्गातच साजरा करण्याचे ठरविले. 

        
दुपारच्या सुट्टीत त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचं ठरलं. यामध्ये त्यांच्या शिक्षिका देखील सहभागी झाल्या. यासाठी शाळेलगतच्या परिसरात असलेल्या एका दुकानातून केक आणला. मोठ्या उत्साहात त्या विद्यार्थिनींचा वाढदिवस साजरा करण्यात आला.मात्र, हा केक खाल्ल्यानंतर 15 विद्यार्थिनींना मळमळ आणि उलटीचा त्रास जाणवू लागला. 

त्यानंतर विद्यार्थिनींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. शाळेतील 15 विद्यार्थिनींना केक खाल्ल्याने विषबाधा झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.केकमधून विषबाधा झाल्याने हा प्रकार घडला असावा असा पालक आणि विद्यार्थिनींचा दावा आहे. दरम्यान, शाळा व्यवस्थापनाने या प्रकाराची दखल घेत योग्य तक्रार करणार आहे.