चंद्रपूर:प्रेमाला प्रतिसाद देत नाही म्हणून त्याने तिला भर चौकात केली मारहाण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२६ फेब्रुवारी २०२०

चंद्रपूर:प्रेमाला प्रतिसाद देत नाही म्हणून त्याने तिला भर चौकात केली मारहाण

आरोपीला तेलंगणातून केली अटक
 जनता महाविद्यालय चौकातील घटना
चंद्रपूर/ललित लांजेवार:
 प्रेमाला प्रतिसाद देत नाही म्हणून एका युवकाने १२ वीत शिकत असलेल्या एका मुलीला भर चौकात मारून तिला जखमी केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर येथील जनता महाविद्यालयाच्या परिसरात घडली.मोनू गोवर्धन मिश्रा असे या घटनेतील आरोपीचे नाव आहे.

घटना घडल्या नंतर आरोपी फरार होता.त्यानंतर पोलिसांनी शोध पथक तयार करून आरोपीचा शोध घेतला. त्याच्यावर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगीनाबाग परिसरातील एक युवती शिकवणीसाठी जनता महाविद्यालयाच्या परिसरात गेली होती. त्याचवेळी मोनू मिश्रा तिथे आला. रस्त्यातच तिला थांबविले. तिला रस्त्यातच मारहाण केली. फोनवर बोलत नाही, प्रेमाला प्रतिसाद देत नाही असे म्हणून मोनूने तिला रस्त्यातच मारहाण केली. यात तिच्या डोळ्याला जखम झाली. घरी येऊन तिने घडलेला प्रकार तिने आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर याची रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.


 पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी मोनू मिश्रा आरोपीच्या शोधात पथके तयार करण्यात आली होती. तो तेलंगणात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेलंगणा येथे पोलिसांचे एक पथक गेले. तेथून त्याला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रकाश हाके यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक संदीप काङ्कडे, सहायक फौजदार जाधव, चिकाटे, येरमे, माजीद, विकास यांनी केली