यवतमाळ; भीषण अपघातात 7 जण जागीच ठार तर 14 जखमी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१६ फेब्रुवारी २०२०

यवतमाळ; भीषण अपघातात 7 जण जागीच ठार तर 14 जखमी


यवतमाळ : 

कळंब पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या जोडमोहा येथे टाटा मॅजिक वाहन उलटून अपघातात जागीच 7 ठार तर 14 जखमी झाल्याची घटना घडली आहे.ही घटना जोडमोहा जवळ वाढोणा खुर्द गावाजवळ हा भीषण अपघात झाला वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन झाडावर आदळून खोल नाल्यात पलटी झाले.


अमर आत्राम (२७) चालक, महादेव चंदनकर (६२), किसन परसंकर(६०) रा.जोडमोहा, महादेव बावनकर (५३) रा.ठोंद्रजना घाट, गणेशा चिंचोळकर (५२) रा.महागाव, अंजना वानखडे (६०), सरस्वताबाई दाभेकर (६८) अशी या घटनेतील मृतांची नावे आहेत. 


हे सर्वेजण अंत्यविधीसाठी कोटेश्वर येथून परतताना झाला अपघात झाला.जोडमोहा येथील मय्यत बाबाराव वानखडे यांची राख शिरवण्यासाठी सर्व जण कोटेश्वरला गेले होते.या अपघातात मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. गंभीर जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.