महिलांना सन्मान देऊन सामाजिक भेदाभेद नष्ट केला पाहिजे :- कुंदा कांबळे लोखंडे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३१ जानेवारी २०२०

महिलांना सन्मान देऊन सामाजिक भेदाभेद नष्ट केला पाहिजे :- कुंदा कांबळे लोखंडेमायणी,ता.खटाव जि.सातारा
माणूस म्हणून सगळ्यांच्या आयुष्याचे मोल सारखेच असते म्हणून निसर्गाच्या अवकृपेने अकाली वैधव्य आलेल्या महिलांना आपण सन्मान देऊन सामाजिक भेदाभेद नष्ट केला पाहिजे असे प्रतिपादन कुंदा लोखंडे कांबळे यांनी केले .जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडाचामळा यांच्या वतीने आयोजित केलेल्या हळदीकुंकू कार्यक्रमानिमित्त त्या बोलत होत्या यावेळी एकात्मिक प्रकल्प अधिकारी पाटोळे मॅडम फुलपा खरात, सविता रोकडे ,माधुरी देवकर ,सुषमा शिंदे ,भावना चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती .
पुढे त्या म्हणाल्या" संक्रात हा महिलांचा आनंद आणि उत्साहाच सण आहे  परंतु त्यापलीकडे जाऊन अनेक वीरमाता ,वीरपत्नी त्यांच्या आयुष्याचे समर्पण अधिक असते त्यांच्या त्यागाचे आणि माणूसपणाचे मूल्य जपणे समाजातील सर्व स्त्रियाचे कर्तव्य आहे हे मानून मार्गक्रमण करणे हे शिक्षनातून शिकवलं जातं आहे .आपणच सर्व महिलांनी एक पाऊल उचलून सर्व महिलांना आत्मसन्मान दिला पाहिजे.

यावेळी उपस्थित असलेल्या श्रीमती मीना माने, शांता देशमुख ,मीनाक्षी माळी, मंगल माळी या महिलांनी निसर्गाच्या अवकृपेने नंतर खूप वर्षांनी मिळालेल्या सन्मानामुळे अश्रू अनावर होऊन आनंदितमनाने शाळेचे आभार मानले. हा सन्मानआयुष्यात कधीही विसरणार नाही   असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमास पार्वती जाधव, लक्ष्मी कुंभार, मीरा देशमुख ,,वंदना पवार ,शारदा देशमुख ,सुजाता जाधव ,कविता जाधव इत्यादी उपस्थित होते शिल्पा खरात यांनी आभार मानले