आता सार्वजनिक बोरवेल ला सुद्धा जलपुनर्भरण यंत्रणा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०१ जानेवारी २०२०

आता सार्वजनिक बोरवेल ला सुद्धा जलपुनर्भरण यंत्रणा
जलपुनर्भरण करिता शहरातील सर्व बोरवेलला ही यंत्रणा तयार करण्यात येईल - आयुक्त काकड़े

इको-प्रो च्या प्रयत्नाची आयुक्ताकडून पाहणी

इको-प्रो चे 'रेनवाटर-वेस्ट वाटर हार्वेस्टिंग' संकल्प वर्ष - महानगरपालिका सोबत करणार जनजागृती

चंद्रपूर : शहरातील सार्वजनिक बोरवेल ला जलपुनर्भरण यंत्रणा उभारण्याकरिता इको-प्रो तर्फे तयार करण्यात आलेल्या बोरवेल च्या यंत्रणेची ची पाहणी आज महानगरपालिकेचे आयुक्त संजय काकडे यांनी भेट देत केली.

मागील वर्षी 5 जून 2018 पासून इको-प्रो ने रेनवाटर हार्वेस्टिंग जनजागृती व संकल्प अभियान सुरु केले होते. महानगरपालिका व इको यावर संयुक्तपणे कार्य करित आहे. यासोबत इको-प्रो ने जिल्हाधिकारी यांचेकडे वेकोली च्या सीएसआर मधून नागरिकांना अनुदान देण्यात यावे अशी मागणी इको-प्रो ने केली होती. वेकोली कडून अनुदान मंजूर करण्यात आल्याने आता प्रत्येक नागरिकांना घरी रेनवाटर हार्वेस्टिंग यंत्रणा उभरण्यास 5 हजार चे अनुदान मिळणार आहे. यात पालिका कडून अडीच हजार तर वेकोली कडून अडीच हजार देण्यात येईल. या निधी मधून सार्वजनिक बोरवेल चे वाया जाणारे पाणी तिथेच जमिनीत पुनर्भरण करता यावे म्हणून सार्वजनिक बोरवेल जवळ यंत्रणा उभारन्याची मागणी सुद्धा करण्यात आलेली होती. सदर मागणी करिता आयुक्त यांनी सकारात्मकता दर्शवील्याने आणि पुढाकार घेतल्याने इको-प्रो ने महानागरपालिकेच्या खर्चाने विठ्ठल मंदिर वार्ड मधील 2 बोरवेल नमूना म्हणून सदर यंत्रणा तयार केली आहे. या बोरवेल ची पाहणी आज आयुक्त काकड़े यांनी केली. सदर प्रकल्प अत्यंत महत्वपूर्ण असून अतिशय योग्यरित्या बांधकाम केल्याचे तसेच याच पद्धतीने शहरात सर्व बोरवेलला यंत्रणा उभारुन जलपुनर्भरण करण्यात येईल, असे स्पष्ट केले. यावेळी पालिकेचे अभियंता रवि हजारे, इको-प्रोचे बंडु धोतरे, नितिन रामटेके, धर्मेंद्र लुनावत, अमोल उत्तलवार, सचिन धोतरे, सुनील मिलाल उपस्थित होते.

सार्वजनिक बोरवेल चे जलपुनर्भरण सोबतच लगतचे घराचे रेनवाटर हार्वेस्टिंग शक्य होईल

शहरातील सार्वजनिक बोरवेल ला लागून 4 फुट लांब व 4 फुट रुंद व 4 फुट खोल गड्डा करून शोषखड्डा तयार करण्यात आले असून, यामधे तयार कांक्रीट पाइप टाकण्यात आलेले आहे. त्यात गिट्टी, चुरी, बदरी असे फ़िल्टर माध्यम टाकण्यात आलेले आहे. दिवसभर बोरवेल वर पाणी भरताना वाया जाणारे पाणी जमिनीत जिरविले जाईल. यासोबत पावसाळ्यात लगतच्या घरावरिल पावसाचे पाणी सुद्धा रेनवाटर हार्वेस्टिंग केले जाईल.