पाथरी येथे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०४ जानेवारी २०२०

पाथरी येथे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथीपाथरी : - अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळ पाथरी व्दारा वंदनिय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या 51 व्या पुण्यतिथी तथा सावित्रीबाई जयंती आणी सर्व स्मृतीदिन महोत्सव पाथरी येथे पार पाडण्यात आला . या तिन दिवसीय कार्यकमात दररोज सकाळला ग्राम सफाई सामुदाईक ध्यान , सामुदाईक प्राथना घेण्यात आली बुधवार रोजी ह . भ . प . चेतन ठाकरे महाराज यांचे प्रबोधात्मक कार्यकम घेण्यात आले . गुरूवार रोजी सु . श्री कविताताई येनुरकर यांचे किर्तन घेण्यात आले व शुकवार रोजी सकाळला वंदनिय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची पालखी व मिरवणुक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये सर्वधर्मीय गावकरी बांधव व शाळकरी मुले , मुलीनी मोठया संख्येने उपस्थिती दर्शविला या मिरवणुकीमध्ये हनुमानच्या रूपात वेशभुषा केलेले विशेष आकर्शक ठरलेले होते त्यानंतर गोपालकाला व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या उत्सहादरम्यान रमेश पा . ठिकरे , तुकाराम ठिकरे , राजेश सिध्दम , नरेश नैताम , रत्नाकर मेश्राम , राजेन्द्र अि ढया , अशोक सुरपाम , सुरेन्द्र डोंगरवार , राजु सुरपाम , दिलीप ठिकरे , श्रीधर ठिकरे , उध्दव बोरकर , युदिष्ठर ठिकरे , मधुकर चचाणे , आनंदराव धारणे व समस्त अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळ पाथरी यांनी कार्यकमाच्या यशस्वीसाठी मोलाचा वाटा उचलला.