महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रयत्नामुळे उत्तर नागपूरात स्टार बससेवा सुरु..!! - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२० जानेवारी २०२०

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रयत्नामुळे उत्तर नागपूरात स्टार बससेवा सुरु..!!


नागपूर -  उत्तर विधानसभा क्षेत्र, नागपूर अंतर्गत प्रभाग क्रमांक १येथील दुर्गामाता नगर परिसर येथे मनसेच्या शाखा फलकाचे अनावरण तसेच दुर्गामाता नगर ते सीताबर्डी या स्टार बस सेवेचे लोकार्पण मनसे प्रदेश सरचिटणीस श्री. हेमंत गडकरी यांचे हस्ते करण्यात आले. प्रभाग क्रमांक १ नारा चे प्रभाग अध्यक्ष श्री. संदीप चवरे व प्रभाग अध्यक्षा सौ. वर्षा डोमकुंवर यांच्या सततच्या प्रयत्नामुळे प्रशासनाने ही बससेवा जनतेच्या सोयीसाठी आजपासून सुरु केली. या बस सेवेची मार्गक्रमिका दुर्गामाता नगर, मॉडेल स्कूल चौक, ओमनगर, नारा, जरीपटका, भीम चौक, कडबी चौक, एलआयसी चौक, सीताबर्डी अशी राहणार आहे. शुभारंभ प्रसंगी स्टार बस चालक व वाहक यांचे श्री. हेमंत गडकरी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी बोलतांना त्यांनी सांगितले की, प्रभाग क्रमांक १ अंतर्गत येणारा दुर्गामाता नगर व लगतचा परिसर हा अनेक जनसुविधांपासून वंचित आहे. या परिसरातील महिला भगिनी, शाळेकरी विध्यार्थी, जेष्ठ नागरिक यांना मुख्य रस्त्यावर जाऊन बस पकडण्यासाठी बरीच पायपीट करावी लागत होती आता ही थेट सुविधा त्यांच्या परिसरातूनच मनसेच्या मागणीमुळे पूर्ण झाली आहे. परिसरातील प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी जनतेने आग्रही रहावे, मनसेच्या माध्यमातून निश्चितचं ते प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास श्री. हेमंत गडकरी यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला मनसे शहर अध्यक्ष श्री. अजय ढोके, उत्तर विभाग अध्यक्ष श्री. उमेश बोरकर, विभाग सचिव श्री. महेश माने, विभाग सहसचिव श्री. सुनिल गवई प्रामुख्याने उपस्थित होते. प्रभाग अध्यक्ष श्री. संदीप चवरे व सौ. वर्षा डोमकुंवर यांचेसह सर्वश्री प्रित यादव, प्रेम विश्वकर्मा, रितेश गजभिये, प्रियंशु चंद्रहास, रंगलाल माहुले, रमेश निकोसे, विजय बागडे, माणिक रहांगडाले, भास्कर रोगे, विजय मोरे, रमेश गजभिये, अशोक तिवारी, रमेश वाघमारे, महेश डोमकुंवर, संदीप त्रिपाठी, पंकज ठाकरे, सौ. कृष्णाताई दुबेले, सौ. राखी चंद्रहास, सौ. सविता दहात, सौ. अरुणा सिंगेवार, सौ. गीता कावडे, सौ. सुनीता रंगारी, सौ. लक्ष्मी माहुले, सौ. सविता रोगे, सौ. वत्सला बागडे, यांचेसह अन्य नागरिक उपस्थित होते.