वन स्टॉप क्रायसिस सेंटर या योजनेकरिता इम्प्लीमेंटींग एजन्सी नियुक्तीबाबत संस्थेने करावे आवेदन : रमेश टेटे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३० जानेवारी २०२०

वन स्टॉप क्रायसिस सेंटर या योजनेकरिता इम्प्लीमेंटींग एजन्सी नियुक्तीबाबत संस्थेने करावे आवेदन : रमेश टेटे

चंद्रपूर दि 30
 चंद्रपूर दि 30 जानेवारी : वन स्टॉप क्रायसिस सेंटर चंद्रपूर जिल्ह्यातील संकटग्रस्त महिलांना तातडीने मदत मिळण्यासाठी केंद्रशासन पुरस्कृत वन स्टॉप क्रायसिस सेंटर ही योजना चंद्रपूर येथे सुरू होत असून वन स्टॉप सेंटर योजनेच्या मार्गदर्शिकामध्ये इम्प्लीमेंटींग एजन्सीच्या नियुक्तीबाबत उल्लेख करण्यात आलेला आहे. सदर इम्प्लीमेंटींग एजन्सीला या योजनेत पिडीत महिलांना प्रशिक्षण देणे , कर्मचारी क्षमता बांधणी वतांत्रिक मदत करणे इत्यादी या स्वरूपाचे सदर एजन्सी च्या कामाचे स्वरूप राहिल.
यामध्ये आवेदन करितांना अटी व शर्ती लागू असून यामध्ये वन स्टॉप सेंटर या योजनेच्या व्यवस्थापन समितीच्या निर्देशानुसार इम्प्लीमेंटींग एजन्सीला कार्यवाही करावी लागेल. समितीच्या निर्देशानुसार कामकाज न केल्यास एजन्सीची सेवा बंद करण्यात येईलइम्प्लीमेंटींग एजन्सी करीता आवेदन करणयाऱ्या संस्थेला अन्यायग्रस्तसंकटग्रस्त, पिडीत महिलांच्या हिताच्या क्षेत्रात काम करण्याचा 3 वर्षांचा अनुभव आवश्यक त्याचप्रमाणे प्रशिक्षण देणे कर्मचारी क्षमता बांधणी व तांत्रिक मदत या क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे.
 आवेदन करणाऱ्या संस्थेच्या घटना व नियमावलीमध्ये अन्यायग्रस्तसंकटग्रस्त, पिडीत महिलांसाठी कार्य करण्याचा उल्लेख असलेल्या संस्थेलाच आवेदन करता येईल तसेच सदर कामाबाबत 10 मिनीटाचे सादरीकरण करावे लागेलइम्प्लीमेंटींग एजन्सी करीता आवेदन करणाऱ्या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मंजुर केलेला ठराव जोडण्यात यावाअटी व शर्तीचे पालन करण्यासंबंधी रुपये 100 च्या स्टॅंम्प पेपरवार हमीपत्र सादर करणे आवश्यक आहेआवेदन करणारी संस्था (अ) संस्था नोंदणी अधिनीयम 1860 (ब) सार्वजनीक विश्वस्त अधिनियम 1950 अंतर्गत नोंदणीकृत आवश्यकसंस्था काळ्या यादीत समावेश नसल्याबाबतचे धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे, निती आयोगाची नोंदणी असणे आवश्यक आहेसंस्था ही चंद्रपुर जिल्हयाअतंर्गत नोंदणीकृत असावी, इम्प्लीमेंटींग एजन्सी करीता नियुक्त झालेल्या संस्थेचे व पदाधीकान्याचे पोलीस विभागाकडून चारीत्र्य प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यात येईल व त्यामध्ये पदाधिकाऱ्यांवर फौजदारी किंवा अन्य प्रकारचा गुन्हा आढळल्यास सदर संस्थेची नियुक्ती रद्द करण्यात येईल.
आवेदन अर्ज जाहीरात, बातमीपत्र प्रसिध्द झाल्यानंतर 15 दिवसाच्या आत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी चंद्रपुर, जुना कलेक्टर बंगला,आकाशवाणी केंद्राच्या मागे, सिव्हील लाईन, चंद्रपूर येथे सादर करावा. विलंबाने आलेल्या आवेदन पत्राचा विचार केला जाणार नाही याची नोद घ्यावी असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रमेश टेटे यांनी केले आहे.