नागपूर जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीठ - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०२ जानेवारी २०२०

नागपूर जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीठ

नागपूर/प्रतिनिधी 
राज्यात अनेक ठिकाणी आज अवकाळी पावसाने हजेरी लावली, तर काही ठिकाणी गारपीट झाली. या पावसामुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसण्याची भीती असून शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. 
नागपूर जिल्ह्यात काटोल तालुक्यातील दिग्रस बुद्रुक, शिवाय कळमेश्वर तालुक्यातील मोहपा आणि सावनेर तालुक्यातील खापा परिसरात गारपीट झाली. 

 वाशिम, नांदेड, यवतमाळ, हिंगोलीत भागात मुसळधार अवकाळी पाऊस पडला. तर विदर्भातील वर्धा, नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील काही भागात गारपीट झाली. या अवकाळी पावसामुळे खरिप हंगामातील तूर, कपाशी आणि रब्बी हंगामातील गहू, हरबरा या पिकांचे नुकसान झाले आहे.


◼ अमरावतीत जिल्ह्यात रात्री अनेक ठिकाणी गारपीटसह पावसाने हजेरी लावली. परतवाडा, अंजनगाव सुर्जी, धारणी आणि तिवसा या तालुक्यांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला आहे.

◼ यवतमाळ जिल्ह्यात अनेक तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

◼ हिंगोलीत सकाळी सहा वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील इतरही भागात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या.