शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सेनेकडून ८० अनाथांनी बघितला मोफत तान्हाजी चित्रपट - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२३ जानेवारी २०२०

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सेनेकडून ८० अनाथांनी बघितला मोफत तान्हाजी चित्रपट

चंद्रपूर: 

हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त चंद्रपूर जिल्हा शिवसेनेने 23 जानेवारीला दिव्यांग व अनाथालयातील मुलांना तान्हाजी मालूसुरे यांच्या विरगाथेची व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वीर इतिहासाची माहिती मिळावी या माध्यमातून तान्हाजी हा चित्रपट दाखविण्यात आलं.

शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी शहरातील अनाथालय व महिलांच्या दिव्यांग संस्थेतून तब्बल 80 मुलांना व महिलांना हा चित्रपट दाखविला,   सेनेकडून दाखविण्यात आलेल्या या चित्रपटानंतर सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे आभार मानत आहो,  आतापर्यंत आम्ही साधा चित्रपट गृह बघितला नव्हता परंतु शिवसेना जिल्हाप्रमुखांनी आम्हाला शिवसेनेच्या माध्यमातून ही संधी उपलब्ध करून दिली, अशी भावनिक प्रतिक्रिया ज्ञानाचर्य अपंग बहुद्देशीय संस्थेच्या संचालिका यांनी व्यक्त केली. 

 स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्य जिल्ह्यात ठीक ठिकाणी शिवसेने तर्फे आरोग्य शिबिर, निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आले होते. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मा. संदीप भाऊ गिर्हे आणि युवासेना जिल्हासमन्वयक इंजि. निलेशभाऊ बेलखेडे,यांच्या मार्गदर्शनात आणि शिवसेना महानगर प्रमुख प्रमोदभाऊ पाटील,जिल्हा सरचिटणीस रोहित तिवारी, युवासेना शहरप्रमुख अक्षय अंबिरवर, वसीम भाई, पिंटू धिरडे, अश्विन देवतळे, प्रियांन यांच्या उपस्थितीत युवासेना- शिवसेना चंद्रपूर तर्फे मुखबधीर शाळेमध्ये (जुनुना ) येथे कपडे आणि बिस्कीट वाटपकार्यक्रम घेण्यात आला .