'राष्ट्रीय मतदान दिन' श्री शिवछत्रपती महाविद्यालयात साजरा केला - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२४ जानेवारी २०२०

'राष्ट्रीय मतदान दिन' श्री शिवछत्रपती महाविद्यालयात साजरा केला


जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर येथील श्री शिव शिवछत्रपती महाविद्यालय व निवडणूक आयोग पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ' राष्ट्रीय मतदान दिन' साजरा करण्यात आला. जुन्नरचे नायब तहसिलदार सचिन जी मुंडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रकांत मंडलिक होते. कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थ्याना मतदान प्रक्रियेविषयी सर्व प्रकारची माहिती देताना सचिन मुंढे म्हणाले की वय वर्षे अठरा पूर्ण केल्यानंतर प्रत्येक व्यक्तीने मतदानाचा राष्ट्रीय हक्क बजावला पाहिजे.
प्राचार्य डॉ. चंद्रकांत मंडलिक यांनी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपले हक्क व कर्तव्य यांची सांगड घालून प्रत्येक नागरिकाने मतदान नोंदवून मतदान करण्याचा हक्क बजावणे गरजेचे असल्याचे सांगितले.
पत्रकार मिनानाथ पानसरे यांनी भारतीय लोकशाहीतील निवडणूक प्रक्रियेचे विवेचन केले. मतदान जाणीव जागृती करण्यासाठी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी पोस्टर प्रदर्शन व रांगोळी द्वारे 'मतदान आमचा हक्क' व 'भारतीय लोकशाही व मतदानाचा हक्क', 'युवक व मतदानाचा हक्क' याचे प्रक्षेपण केले. यामध्ये उत्कृष्ट पोस्टर बनवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय,तृतीय,व उत्तेजनार्थ बक्षीसे देण्यात आली. या प्रसंगी तहसील कार्यालयातिल भालेकर मँडम. संजय अहिरे,स्वपनिल दप्तरे,अमोल उतळे, फटांगडे मँडम, विद्यार्थी मंडळ प्रमुख प्रा. कदम,अहमद शेख उपस्थित होते.  प्रास्ताविक प्रा.आबाजी सूर्यवंशी यांनी केले तसेच संचालन एन.एन.एस विभाग प्रमुख प्रा. संतोष गवळी यांनी केले तसेच आभार प्रा.डॉ. राजाराम थोरवे यांनी मानले. प्रा. रेखा गायकवाड यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.