राजापूरात घरांवर मुलींच्या नावाच्या पाट्याने गहिवरले पालक #School - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०२ जानेवारी २०२०

राजापूरात घरांवर मुलींच्या नावाच्या पाट्याने गहिवरले पालक #School
येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार
येवला: तालुक्यातील जि.प.शाळा राजापुर येथे आज "करू सन्मान लेकीचा " हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला.मुलीच्या जन्माचे स्वागत आणि त्यांचा सन्मान करण्याचे भाग्य पालकांना मिळावे.तसेच स्त्री आदराचा शिवरायांनी घातलेला आदर्श डोळ्यासमोर ठेऊनच हे अभियान राबवले जात आहे.
 "लेक वाचवा  लेक शिकवा"हे अभियान  जिल्ह्यात आपल्या सर्वांच्या सहकार्याने  राबवत आहोत.असे मुख्यकार्यकारी अधिकारी एस.भुवनेश्वरी मॕडम ,प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाला झणकर मॕडम यांनी सांगितले व स्वंता यासाठी पुढाकार घेतला आहे.प्रथम शाळेतील परिसर पाणी टाकून,रांगोळी त्यावर विविध घोषणावाक्य लिहिले होते.शाळेतील लहान लहान चिमुकली पावले नटून थटून आली कारण आपल्या नावाची पाटी आपल्या घरावर झळकणार याचा त्यांना खुप आनंद झाला होता.सर्व गावातून  ढोल,झांज,वाद्य वाजवत मुलींची फेरी चालू झाली.यात सर्वांचे लक्ष वेधले ते राणी लक्ष्मीबाई,जिजाबाई, सावित्रीबाई,यांचा पेहराव केलेल्या मुलींनी. विविध घोषणा जसे-बेटी बचाओ  बेटी पढाओ,मुलीचे शिक्षण प्रगतीचे लक्षण,शिकलेली आई घरदार पुढे नेही,अशा वाक्यांनी परिसर दुमदुमून निघाला.मुलींच्या घरासमोर सडा,रांगोळी व गुढी ऊभा करण्यात आल्या होत्या मुलींच्या पावलांचे पुजन आणि औंक्षण आई व वडिलांनी मिळून  केले.शिक्षकांच्या साह्याने मुलीच्या नावाची पाटी घरावर लावण्यात आली.आईच्या चेहऱ्यावर खुप आनंद वाटत होता.पालकांना शिक्षकांनी मुलींचे महत्त्व पटवून सांगितले.मुला प्रमाणे मुलीही वंशाचा दिवा आहेत.ती प्रकाश देते दोन्ही घरी.आजची मुलगीच उद्याची आई,बहिण,आजी,आत्या,बायको आहे त्यामुळे तिचा आदर राखावा.तसेच स्त्रीभ्रुणहत्या,हुंडा बळी,अत्याचार अशा घडू नयेत यासाठी लेक शिकवणे महत्त्वाचे कारण पुरूषांच्या तोडीस तोड मुलगी बनविण्याची शपथ  पालकांना घेतली.
    सर्व मुलीच्या नावाच्या पाट्या,विविध घोषवाक्य पट्या,रांगोळी बॕनर तयार करणे हे काम उपक्रमशील शिक्षक बालाजी नाईकवाडी यांनी केले.  उपक्रमशील शिक्षक रामकृष्ण घुगे यांनी फेरीचे नियोजन केले.उपक्रम यशस्वी करण्यासाठी  दत्तात्रय जाधव,सिंधू विंचू,विठ्ठल आरळे तसेच सर्व विद्यार्थी यांनी सहकार्य केले. यात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोरक्षनाथ भाबड, मंडलीक साहेब ग्रामसेवक ,निलेश जाधव केंद्र प्रमुख सोपान वाघ,अनिस सैय्यद,साईनाथ वाघ,आनिल वाघ,लक्ष्मण घुगे,शंकर अलगट, नवनाथ विंचू,संतोष जाधव,समाधान चव्हाण ,पोपट आव्हाड,प्रविण  बोडके सपंच राजापूर ,महिला माया लोंढे,उज्वला जाधव,मंगल वाघ,सविता वाघ,प्रतिभा भालके,अनिता इप्पर,शोभा अलगट अनेक पालक हजर होते.या उपक्रमाबद्दल    ग्रामस्थांनी शाळेचे व शिक्षकांचे कौतुक केले.