सायगाव येथील रामवाडी येथे लेक वाचवा लेक शिकवा अभियानांतर्गत*करूया सन्मान लेकीचा उपक्रम साजरा! - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०६ जानेवारी २०२०

सायगाव येथील रामवाडी येथे लेक वाचवा लेक शिकवा अभियानांतर्गत*करूया सन्मान लेकीचा उपक्रम साजरा!
येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार

येवला: तालुक्यातील सायगाव येतील रामवाड़ी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सायगाव  येथे सावित्रीबाई फुले जयंती निमित्त ‘करूया सन्मान लेकीचा’, ‘लेक वाचवा लेक शिकवा’ अभियान राबविण्यात आले. यात प्रथम गावातुन प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले, झाशीची राणी, यासारख्या कर्तृत्ववान महिलांची वेशभूषा केली होती. मुलींच्या हातात त्यांच्या नावाच्या पाट्या देण्यात आल्या, प्रभात फेरीमध्ये मुलगी शिकली प्रगती झाली, बेटी बचावो बेटी पढाओ, मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. प्रत्येक मुलीच्या घरी जावुन त्यांचे औक्षण केले. यावेळी मुलींच्या घरासमोर सुंदर रांगोळी काढून गुढी उभारण्यात आली .
त्यानंतर प्रत्येक मुलीच्या नावाची पाटी दरवाजावर लावली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली दंडगव्हाण यांनी प्रत्येक मुलीच्या आईला शिक्षणाचे महत्व पटवुन दिले.शाळेतील एकूण 19 मुलींच्या घराला पाट्या लावण्यात आल्या. सदर अभियान प्रसंगी  सायगाव सोसायटीचे चेअरमन विजय खैरनार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मयूर खैरनार, माजी सरपंच गोरख उशीर, अरुण जानराव, गणपत खैरनार, अंगणवाडी सेविका मंदाकिनी पावडे   अंकुश खैरनार, काशिनाथ बत्तासे,  सरला बत्तासे, सुनीता खैरनार ,अनिता खैरनार ,योगिता खैरनार, विठाबाई उशीर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. या अभियानास गावातुन भरभरून प्रतिसाद मिळाला. शाळेतील शिक्षक नितीन गावित, यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.