किल्ला स्वच्छता अभियानात राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२१ जानेवारी २०२०

किल्ला स्वच्छता अभियानात राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग

इको-प्रो सदस्य व महाविद्यालयिन विद्यार्थि कडून श्रमदान

चंद्रपूर: इको संस्थेच्या माध्यमाने सुरू असलेल्या चंद्रपूर जिल्हा परकोट स्वच्छता अभियानात आज स्थानिक राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी श्रमदानात सहभाग घेतला.

चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियान मागील साडेआठशे दिवसापासून सुरू आहे. या अभियानात विविध शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी श्रमदान करिता सहभागी होत असतात. आज राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभाग च्या जवळपास 70 विद्यार्थ्यांनी श्रमदानात सहभागी झाले होते. इको-प्रो संस्थेच्या सदस्यासह विद्यार्थ्यांनी किल्ला बुरुज क्रमांक तीन लगतचा किल्ल्याचा पादचारी मार्ग वरील वाढलेली झाडे झुडपे सफाई करण्यात आली. सदर कार्यक्रम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागाचे प्रमुख प्रवीण पोटदुखे सर यांच्या मार्गदर्शनात पंकज चिमुरकर या विद्यार्थ्यांच्या नेतृत्वात इतर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
स्वच्छता अभियान नंतर या सर्व विद्यार्थ्यांनी चंद्रपूर किल्ला पर्यटन म्हणजेच हेरिटेज वॉक मध्ये सहभाग घेतला. बगड खिडकी ते अंचलेश्वर मंदिर प्रयन्त हेरिटेज वॉक करीत किल्ला स्वच्छता अभियाना विषयी, गोंडकालीन इतिहासाविषयी आणि किल्ला संवर्धनासाठी सुरू असलेले प्रयत्न याविषयी इको-प्रो चे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी माहिती दिली. किल्ला स्वच्छता अभियान ते किल्ला पर्यटन पर्यंतचा संपूर्ण प्रवास छायाचित्राच्या माध्यमाने विद्यार्थ्यांनी जाणून घेतला. यापुढे सुद्धा किल्ला स्वच्छता व संस्थेच्या पर्यावरण क्षेत्रातील उपक्रमांमध्ये भाग घेणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
यावेळी प्रा. प्रवीण पोटदुखे, संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे, नितिन रामटेके, धर्मेंद्र लुनावत, राहुल कुचनकर, विद्यार्थी पंकज चिमुरकर, मंथन मामिडवार, प्रणय साठे, तेजस वैद्य, मिलिंद डांगे, सौरभ भोयर आदी असंख्य विद्यार्थी सहभागी होते।