जुन्नर तालुका मराठी पत्रकार संघाची नुतन कार्यकारणी जाहिर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०८ जानेवारी २०२०

जुन्नर तालुका मराठी पत्रकार संघाची नुतन कार्यकारणी जाहिर जुन्नर /आनंद कांबळे 
 जुन्नर तालुका मराठी पत्रकार संघाची वार्षीक बैठक अोतुर येथे येथे मावळते अध्यक्ष गोकुळ कुरकुटे यांच्या अध्यक्षते खाली पार पडली यामध्ये सन 2020 च्या अध्यक्षपदी अॅड. संजय रावजी शेटे यांची निवड तर उपाध्यक्षपदी अतुल कांकरिया व सचीवपदी सचीन कांकरिया यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे कुरकुटे यांनी जाहिर केले.
       या वेळी जिल्हा पत्रकार संघाचे मान्यवर व एकुण 42 पत्रकारांची उपस्थिती होती.बैठकीत दिवंगतांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.तर विविध स्तरावर कार्य करुन गौरविलेल्या व्यक्तींचा नुतन अध्यक्ष शेटे यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात  करण्यात आला.
            यावेळी शिवसेना प्रमुख संभाजी तांबे या सोबत अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यकारणी पुढील प्रमाणे : अध्यक्ष :अॅड संजय शेटे, उपाध्यक्ष : अतुल कांकरिया,
उपाध्यक्ष:  मिननाथ पानसरे, सचीव : सचिन कांकरिया,
कार्याध्यक्ष : धनंजय गुलाबराव रोकडे ,
सह सेक्रेरटरी : नितीन ससाणे,खजीनदार : पराग जगताप,
सह खजीनदार : विजय देशमुख, 
आेतुर विभाग प्रमुख पदी रमेश तांबे,
जुन्नर विभाग प्रमुख  ईच्चुभाई सैयद, 
नारायगाव विभाग प्रमुख  अमर भागवत,आळेफाटा विभाग प्रमुख अर्जुन शिंदे ,तक्रार निवारण समिती : सुरेश अाण्णा भुजबळ,प्रसिध्दी प्रमुख:नितीन गाजरे,सल्लागार भरत अवचट,दत्ता म्हसकर सर, ज्ञानेश्वर भागवत,
रविंद्रपाटेसर ,धर्मेंद्र कोरे,रामनाथ मेहेर,अानंद कांबळे,लक्ष्मण शेरकर,(सदस्य) जिल्हा कमेटी,वसंत शिंदे
         मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्नित पुणे जिल्हा पत्रकार संघाचे सभासद जयेश शहा यांनी निवडणूक निर्णय अधिकारी  व विवेक शिंदे यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून  कामकाज पाहिले.
     पत्रकार परिषदेचे विश्वस्त मा. श्री. एस. एम. देशमुख व पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष मा. शरद पाबळे ,पुणे विभागीय सचिव बापूसाहेब गोरे, यांच्या नियोजनाखाली जुन्नर तालुका मराठी पत्रकार संघाची कार्यकारणी कार्यरत राहील असे प्रतिपादन नवनिर्वाचित अध्यक्ष अॅड.संजय शेटे यांनी केले.