नरेंद्रनगर भुयारी मार्ग येथे स्थापित श्रद्धांजली स्मारकाची दुर्दशा #ncp - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०४ जानेवारी २०२०

नरेंद्रनगर भुयारी मार्ग येथे स्थापित श्रद्धांजली स्मारकाची दुर्दशा #ncp

 राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन छेडणार ! 
                                      : दिलीप पनकुले
 नागपूर/ प्रतिनिधी 
        नरेंद्रनगर येथील भुयारी रेल्वे मार्ग येथे स्थापित श्रद्धांजली स्मारकाची अत्यंत दुर्दशा झालेली आहे. आघाडी सरकारने या पुलाखाली अपघातात बळी पडलेल्यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली स्मारक बांधले होते. त्या परिसराचे सौंदर्यीकरणही केले होते. मा. ना. अनिल देशमुख यांच्या पुढाकाराने दहा कोटी रुपये मंजूर करून हा भुयारी मार्ग तयार करण्यात आला होता. हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या लक्षवेधी आंदोलनाचे फलित होते. या स्मारकाचे उद्घाटन मा. मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या हस्ते पार पाडण्यात आले होते. परंतु युती शासनाच्या काळात त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आले, ही अत्यंत गंभीर बाब असून जनतेच्या भावनांशी खेळण्याचा हा प्रकार आहे अशी खंत प्रदेश चिटणीस दिलीप पनकुले यांनी व्यक्त केली. याबाबत त्वरित दुरुस्ती व सौंदर्यीकरण बांधकाम विभागाने पंधरा दिवसात सुरू न केल्यास अधीक्षक बांधकाम विभाग यांना घेराव करून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी प्रदेश काँग्रेसतर्फे दिलीप पनकुले यांनी दिला आहे.