दुष्काळी भागातील व्यथांची जान असणारा आमदार स्वर्गिय धोंडीराम वाघमारे - आमदार शहाजीबापू पाटील - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३० जानेवारी २०२०

दुष्काळी भागातील व्यथांची जान असणारा आमदार स्वर्गिय धोंडीराम वाघमारे - आमदार शहाजीबापू पाटीलआठवणीतील स्वर्गिय धोंडीराम वाघमारे दादा यांच्या कार्याचा उलगडा करताना अनेकांनी भावनिक होऊन मनोगत व्यक्त केल्याने या वेळी अनेक उपस्थितांना हुंदका आवरला आला नाही.


मायणी ः ता. खटाव जि. सातारा(सतीश डोंगरे)
कायम दुष्काळी माणच्या मातीला कवी मनाचा, संवेदनशील, दुष्काळी भागातील व्यथांची जान असणारा आमदार स्वर्गिय धोंडीराम वाघमारे दादा यांच्या रूपाने लाभल्यानेच आपल्या दहा वर्षांच्या आमदारकीच्या काळात शासनदरबारी,माण तालुक्याला वरदान ठरणार्या उरमोडी व जिहेकटापुर सिंचन योजना मंजूर करून पाया घातल्याने, खर्या अर्थाने स्वर्गिय धोंडीराम वाघमारे दादा हे माणवासियांच्या मनात चिरंतन राहतील असे भावपुर्ण उदगार आमदार शहाजीबापू पाटील यांनी काढले

म्हसवड येथे माजी आमदार  स्वर्गिय धोंडीराम वाघमारे दादा यांच्या 5व्या पुण्यस्मरण दिना निमित्त आ.पाटील बोलत होते. या वेळी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख,अॅड. भास्करराव गुंडगे, अनिलभाऊ देसाई, विश्वभंर बाबर, नगरसेवक शहाजी लोखंडे, विकास गोंजारी,अर्जुनराव खाडे, प्रा. बापुराव देवकर, श्रीमती निर्मला धोंडीराम वाघमारे, अभय वाघमारे, शामराव पवार, केशव वनवे, कारभारी खाडे सपोनि गणेश वाघमोडे, एम के भोसले, गोविदराव काटकर, तुळशीराम काटकर आदि मान्यवर उपस्थित होते.  

                                                                      पुढे बोलताना आ.पाटील म्हणाले  कायम दुष्काळी माण तालुक्याचे आमदार म्हणून धोंडीराम वाघमारे यांनी 10 वर्षे अपक्ष आमदार म्हणून कारकिर्द गाजवली होती. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी दुष्काळी माण तालुक्याला वरदान ठरणाऱ्या उरमोडी, जिहेकटापुर योजना मंजूर करून घेऊन, आंधळी, ढाकणी तलाव पुर्ण करून घेत तालुक्यात जलसंधारणाची अनेक छोटी मोठी कामे करून तालुक्याच्या विकासाला गती देण्याचे काम केले. तसेच त्यांनी 'हुंदका'या काव्यसंग्रहातून दुष्काळी माण तालुक्यातील जनतेच्या दु:ख दारिद्र्य   राज्याच्या पटलावर मांडून शासनाला जाग आणण्याचे काम केले होते.सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या धोंडीराम वाघमारे यांनी दुष्काळी शेतकरी बांधवांचे दुःख जवळून पाहिले होते .इथला दुष्काळ हटवायचा असेल तर  सिंचन योजना प्रभावीपणे राबवल्या पाहिजेत यासाठी त्यांनी मोलाचे कार्य केले .निस्वार्थी व दुष्काळाच्या झळा सोसून दुष्काळाच्या व्यथा आपल्या हुंदका या काव्यसंग्रहातून मांडून सर्वसामान्यांसाठी झटणारा नेता या तालुक्याला लाभला .त्यांच्याच दूरदृष्टीवर आताच्या राजकारण्यांनी पाऊल ठेवले तर निश्चितपणे माण च्या विकासाचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल .असे मा .आ धोंडीराम वाघमारे यांच्या 5 व्या पुण्य स्मरण दिनानिमित्त सांगोल्याचे आ .शहाजीबापू पाटील यांनी भावनिक उदगार काढले 

         या वेळी बोलताना माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी स्वर्गिय धोंडीराम वाघमारे यांच्या दूरदृष्टी व कल्पक नेतृत्वा मुळे कायम दुष्काळी माण तालुक्याच्या मातीला सिंचन योजना मंजूर केल्याने खर्या अर्थाने ते या योजनांचे जनक मानले गेले आहेत. तर अॅड भास्करराव गुंडगे म्हणाले मी दादा बरोबर दहा वर्षे सतत सोबत राहलो त्यांनी सर्व सामान्य जनतेत मिसळून चटणी भाकरी खाऊन  माणच्या मातीला लागलेला दुष्काळाचा कलंक पुसण्याचं काम करून तालुक्यात विकासाचे जाळे निर्माण करत तालुक्यातील बहुतांश ज्युनिअर कॉलेज, पतसंस्था उभ्या करण्यासाठी सहकार्य केल्याने तालुक्यात मुला मुलींचा शिक्षणासाठी फायदा झाला शिवाय पतसंस्था उभ्या राहिल्याने शेतकर्याची बाजार पेठेत पत निर्माण करण्याचे कामही त्यांनीच केले असल्याचे सांगितले, तर अनिलभाऊ देसाई यांनी वाघमारे दादा हे विकासाभिमुख नेतृत्व होते त्यांनी कधीही अडवा अडवी व जिरवा जिरवीचे राजकारण न करता पाणी आडवा पाणी जिरवा ही कामे करून तालुक्याच्या विकासाला गती देण्याचे काम केल्याचे सांगितले, या स्वर्गिय धोंडीराम वाघमारे दादा यांच्या पत्नी श्रीमती निर्मला वाघमारे यांनी माणवासिय जनतेच्या ॠणात वाघमारे कुटुंबिय कायम राहिल असे सांगून तालुक्यातील जनतेनं दादांवर अफाट प्रेम केले होते.तर अभय वाघमारे यांनी हुंदका या काव्यसंग्रहातून सन1983 मध्ये माणच्या व्यथा मांडून वाघमारे दादा यांनी दुष्काळी भागातील तडफडणार्या मनाला स्पर्श केला होता. आज 37वर्षी नंतर माण आवस्था दयनीय आहे. पुढिल काळात या मध्ये बदल करण्यासाठी या मातीवर प्रेम करणार्या संवेदनशील माणसांनी पुढाकार घेतला पाहिजे अशी भावना व्यक्त केली. 

      या वेळी प्रा. विश्वभंर बाबर, कारभारी खाडे, प्रा बापुराव देवकर यांनी मनोगत व्यक्त केले तर तुळशीराम काटकर यांनी सुत्रसंचालन केले पुण्यस्मरण दिनाच्या कार्यक्रमास माण खटाव फलटण तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री कार्यालयाचे माजी सहसचिव नंदकुमार मारूती शिलवंत यांना या वेळी भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.