चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे हुतात्म्यांना आदरांजली - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३० जानेवारी २०२०

चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे हुतात्म्यांना आदरांजलीचंद्रपूर ३० जानेवारी - भारतीय स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती दिलेल्या हुतात्म्यांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे मा. महापौर सौ. राखी कंचर्लावार व आयुक्त श्री. संजय काकडे यांच्याद्वारे गुरुवार ३० जानेवारी रोजी हुतात्मा स्मारक येथे आदरांजली वाहण्यात आली. हुतात्मादिनाचे औचित्य साधून मा. महापौर सौ. राखी कंचर्लावार यांच्या हस्ते जटपुरा गेट व गांधी चौक येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच प्रियदर्शिनी इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी मा. महापौर यांनी स्वातंत्र्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या हुतात्म्यांचे स्मरण केले. हुतात्म्यांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका कार्यालयात दोन मिनिटे मौन बाळगून आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी माजी महापौर सौ. अंजली घोटेकर, झोन क्र. १ सभापती श्री. बंटी चौधरी, नगरसेविका छबूताई वैरागडे, उपायुक्त श्री. गजानन बोकडे, सहायक आयुक्त शीतल वाकडे, उपअभियंता श्री. अनिल घुमडे, श्री. अनिल घुले, प्रभाग अधिकारी श्री. भाऊराव सोनटक्के. श्री. नामदेव राऊत, श्री. आशीष जीवतोडे,श्री. आशिष भारती, श्री. विकास दानव, श्री. मयूर मलिक, श्री. गुरुदास नवले, तसेच पालिकेतील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.