यवतमाळ जिल्हा दारूबंदी साठी जयंत पाटील अनुकूल - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२४ जानेवारी २०२०

यवतमाळ जिल्हा दारूबंदी साठी जयंत पाटील अनुकूल
स्वामिनीला दिलेला शब्द पाळनार
----------------------------------------

यवतमाळ/ प्रतिनिधी
गेल्या ५ वर्षांपासून स्वामिनी संघटनेच्या माध्यमाने यवतमाळ जिल्ह्यातील महिला व सुजाण नागरिक दारूबंदीची मागणी करीत आहेत. या दारुबंदी साठी राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अनुकूल असून त्यांनी स्वामिनी शिष्ट मंडळाला आश्वस्त केले आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांना यवतमाळ दारूबंदी करावी असे लेखीपत्र पाठवीले. अशी माहिती स्वामिनी चे मुख्य संयोजक महेश पवार यांनी सांगितले.
यवतमाळ जिल्हा दारू बंदी चे आंदोलन २०१५ पासून सुरु आहे. अनेक आंदोलन झालित मात्र भाजप सरकारच्या काळात न्याय मिळाला नाही. त्याच दरम्यान राष्ट्रवादी पक्षाची हल्ला बोल यात्रा यवतमाळ जिल्ह्यतून जात असतांना स्वामिनिच्या २०० महिलांनी यात्रा अडवून दारूबंदीचा मुद्दा मांडला होता त्यावेळेस सुप्रिया ताई सूळे, जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून, आमच सरकार आल्यास यवतमाळ जिल्हा दारू बंदी करु असे आश्वासन दिले होते
त्यानंतर १७ जुलाई २०१८ ला पवासाळी अधिवेशन नागपुर येथे सभागृहात जयंत पाटील यांनी स्वामिनीच्या मागणीची दखल घ्यावी ही सरकारला विनंती केली होती, जर भाजपा सरकारने यवतमाळ जिल्हा दारूबंदी केली नाही तर आमच सरकार आल्यास पहिल्या क्याबिनेट मधे यवतमाळ जिल्हा दारूबंदी करु असे आश्वासन सभागृहात दिले होते.
याच अश्वासनाची पूर्तता करावी यासाठी स्वामिनीचे शिष्ट मंडळ जयंत पाटील यांना मुंबई येथे दिनांक २३, गुरूवारला भेट घेतली त्यावेळी जयंत पाटील यांनी यवतमाळ दारूबंदी साठी आम्ही अनुकूल आहोत. यावर निर्णय घेण्यात यावा असे लिहून राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांना स्वामिनीचे निवेदन पाठविले.
  स्वामिनी जिल्हा दारुबंदी आंदोलन यवतमाळने आज पर्यंत शेकडो आंदोलने केली यवतमाळ जिल्ह्यातील असंख्य पीडित परिवारांचा पाठिंबा मिळाला आहे.  यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींनी दारूबंदीचा प्रस्ताव पारित केला आहे. दारुविक्रीपासून मिळणारा महसूल राज्यसरकार करिता महत्त्वाचा असला, तरी राज्याच्या जनतेच्या समृद्धीकरिताही सरकार वचनबद्ध असत. व्यसनामुळे असंख्य परिवारांची वाताहात होत आहे.आपण मंत्री या नात्याने कृपया हे लक्षात घ्यावी विनंती स्वामिनी शिष्ट मंडळा कडून करण्यात आली. 
        या शिष्ट मंडळात स्वामिनीचे मुख्य संयोजक महेश पवार, विभागीय संघटक मनीषा काटे, सरोज देशमुख, धीरज भोयर, संजीवनी कासार, रेखा उदे, मोतीबाई तोडसाम सहभागी होते.

जयंत पाटीलांनी मोतीबाईची विचारपुस केली
 मोतीबाई तोडसाम वय ५० वर्षे, जयंत पाटलांना प्रश्न केला. साहेब, आमी किती मोर्चे काडलो, तुमी आमची हाक काऊन आइकुन नाही राहिले. घरी दोन पोर अन नवरा तिघही दारू पिऊन मारते, मी किती दिवस मार खाऊ? तुमच्या पाया पडतो दारूबंदी करा ! मोतीबाई च्या डोळ्यात अश्रु दाटून आहे आणि जयंत पाटीलही भावुक झाले.