जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गारखेडा बनली आयएसओ नामांकित शाळा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०३ जानेवारी २०२०

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गारखेडा बनली आयएसओ नामांकित शाळायेवला प्रतिनिधी/ विजय खैरनार

येवला:तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गारखेडे ही तालुक्यापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेली इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत वर्ग असलेली द्विशिक्षकी शाळा. शाळेची पटसंख्या ही गेल्या काही वर्षापूर्वी तीस पर्यंत होती त्यानंतर शाळेतील वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये यश मिळवत  व आपली गुणवत्ता वाढवत शाळेची पटसंख्या चाळीसच्या आसपास नेण्याचा प्रयत्न केला. शाळेमध्ये दोन वर्गखोल्या व त्यांना कुठल्याच प्रकारचा कुंपण  नसल्यामुळे त्या ठिकाणी मोकाट जनावरे व धूम्रपान करणाऱ्यांचा खूपच त्रास होत असायचा कधी कधी पिसाट कुत्र्यांमुळे व  रहदारी वाहनांमुळे शालेय विद्यार्थ्यांना अपघाताची भीती असायची परंतु या समस्येवर मात करण्यासाठी शाळेचे  मुख्याध्यापक श्री. संदिप वारुळे यांनी शालेय व्यवस्थापन समितीच्या सहकार्यातून शासन दरबारी व ग्रामपंचायतीशी अनेकदा पत्रव्यवहार केला आणि त्याचे फलित म्हणजे चौदाव्या वित्त आयोग अंतर्गत शाळेला 2018 साली तार कुंपण करण्यात आले. त्यानंतर शाळेला पेवर ब्लॉक, विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृह याची पण व्यवस्था करण्यात आली आणि त्याचेच पुढचे पाऊल म्हणजे शाळा पर्यावरण युक्त करण्याकरिता पालकांच्या सहकार्यातून वृक्षारोपण करण्यात आले. याच पद्धतीने शाळेने गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेत जिल्हास्तरावर वक्तृत्त्व स्पर्धेमध्ये सलग चार वेळा विजेतेपद पटकावले आहे व तालुका विज्ञान प्रदर्शनामध्ये गेल्या दहा वर्षापासून शाळा वेगवेगळ्या क्रमांकाने आपले स्थान टिकून आहे. त्याच पद्धतीने शाळेचे विद्यार्थी गुणवत्ता मध्ये सुद्धा प्रगत असून शाळासिद्धी मध्ये सुद्धा शाळा 'अ' श्रेणीत आहे. अशा विविध पूर्ण उपक्रमामुळे शाळेला आयएसओ प्रमाणपत्र मिळण्यास कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही तसेच शाळेत स्वच्छता दूत, उपस्थिती पदक सारखे नाविन्यपूर्ण उपक्रम सुद्धा राबवले जातात.  परस बाग तयार करून शाळेत पालेभाज्या तयार केल्या जात आहे. त्याच प्रमाणे  वाढदिवसानिमित्त विद्यार्थीही शाळेला वेगवेगळ्या प्रकारच्या भेटवस्तू देऊन शालेय साहित्यात भर टाकत असतात. शाळेत परिपाठ संगीत मय वातावरणात घेतला जातो. शालेय विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी रात्री च्या वेळी गॅदरिंग आयोजित केले जाते. तसेच विद्यार्थ्यांना पर्यटन घडावे म्हणून सहल व परिसर भेट सारखे उपक्रम दरवर्षी राबविले जातात.  शाळेने लोकसहभागाच्या माध्यमातून रंगकाम,ऑडिओ सिस्टिम, रंगमंच, ई लर्निंग साहित्य घेतले आहे. तसेच शाळा ही डिजिटल बनवली आहे.अशा विविध पूर्ण उपक्रम आणि नटलेली ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गारखेडे जिने आज तालुक्यातील चौथे आयएसओ मानांकित होण्याचा मान मिळवला आहे. यापुढेही शाळा वेगवेगळ्या क्षेत्रात आपले वर्चस्व दाखवून शाळेचा नावलौकिक वाढवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मुख्याध्यापक श्री संदिप वारुळे  यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.  यासाठी त्यांना जे सहकारी लाभले त्यात श्री. विजय मुंगसे, श्रीमती अश्विनी खराडे व  श्रीमती माला राठोड गारखेड़ा येतील सरपंच संजय खैरनार ,नानासाहेब आहेर ,संतोष गायकवाड सामाजिक कार्यकर्ते विजय खैरनार यांनीसुद्धा सरांच्या ह्या प्रयत्नाला बळकटी प्राप्त करून देण्यासाठी मोलाचे सहकार्य केलेले आहे. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष संदीप खैरनार, संजय खैरनार तसेच सध्या कार्यरत असलेली संतोष खैरनार व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी सुद्धा मोलाचे सहकार्य केलेले आहे.शाळेला वरील कामी विस्तार अधिकारी श्रीमती चव्हाण मॅडम ,गटशिक्षणाधिकारी ,श्री मनोहर वाघमारें व गटविकास अधिकारी श्री. उमेश देशमुख यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असते.