प्रदर्शनाचे उद्घाटन करणार पोलीस आयुक्त - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०७ जानेवारी २०२०

प्रदर्शनाचे उद्घाटन करणार पोलीस आयुक्तऔरंगाबाद: शुभस्वप्न समूहाचे तर्फे 9,10,11 जानेवारी ला "एक्स्पो 2020" ह्या भव्य दिव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे ह्यामध्ये एकूण 70 उद्योजक सहभागी होणार आहे उद्योजक-पुणे,नगर,जळगाव, मुंबई, हैद्राबादी, इचलकरंजी, सोलापूर, जालना,बीड,नंदुरबार,पंढरपूर ह्याठिकाणांहून येणार आहे.
गृहउपयोगी ते ज्वेलरी पर्यन्त सर्व उत्पादन,प्रॉडक्ट येथे उपलब्ध असणार आहे.
ह्या भव्य खरेदी विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन मा. चिरंजीव प्रसाद पोलीस आयुक्त औरंगाबाद शहर ह्यांच्या हस्ते 9 जानेवारी 2020 रोजी दुपारी 1 वाजता होणार आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून  मा. शिरीष बोराळकर (प्रदेश प्रवक्ते भाजप) मा. अनिल कौसडीकर (चेयरमन भारतीय युवा शक्ती ट्रस्ट) मा. सुनील गालफाडे (मार्गदर्शक शुभस्वप्न समूह) तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष शुभम गालफाडे(संचालक शुभस्वप्न समूह).
निमंत्रक-स्वप्नील कुलकर्णी,सुयोग कुलकर्णी, वृंदा देशमुख, प्रकाश देशमुख, आनंद लोणकर इ. ह्यांची उपस्थिती असणार आहे.
शुभस्वप्न समूहा तर्फे दर वर्षी दोन वेळेस ह्या एक्स्पो चे आयोजन करण्यात येत असते.दर वर्षी एक्स्पो ला खूप चांगला प्रतिसाद मिळतो तसेच ग्राहकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असते.