दिनेश इमिटेशन ज्वेलरी नवीन शोरुमचा शुभारंभ - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३१ जानेवारी २०२०

दिनेश इमिटेशन ज्वेलरी नवीन शोरुमचा शुभारंभ
खरेदीवर मिळवा लकी ड्रॉ कुपन आणि जिंका 🛵


चंद्रपूर/ प्रतिनिधी

ज्वेलरी क्षेत्रात प्रदीर्घ परंपरा जपणा-या दिनेश ज्वेलर्सच्या नव्या शोरूमचे दि. 17 व 18 जानेवारी रोजी उद्घाटन झाले. दोन दिवस चाललेल्या या उद्घाटन समारंभात चंद्रपूरातील सराफा ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती.


दिनेश ज्वेलर्सने आपल्या ग्राहकांच्या सोयी आणि सुविधेसाठी दिनेश इमिटेशन ज्वेलरी ही नवीन शोरुम जैन मंदिर समोर, सराफा लाइन येथे स्थापित केली. चंद्रपूरच्या लोकांनी उदंड प्रतिसाद दिल्याने आत्ता या ठिकाणी सर्व प्रकारचे दागिने उपलब्ध केले जाणार आहेत.

अत्याधुनिक शैलीचे दागिने देखील ग्राहकांसाठी उलपब्ध केले जाणार आहेत. शोरुमचे संचालक ओमजी वर्मा, दिनेश वर्मा, दीपक वर्मा यांना ज्वेलरी क्षेत्रातील प्रदीर्घ असा अनुभव असून या शोरूमच्या आगमनाने ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार दागिने निवडण्याची सर्वोत्तम अशी संधी उलपब्ध झालेली आहे.तेथील ग्राहकांचा विश्वास संपादन करून ज्वेलरी क्षेत्रातील घोडदौड कायम ठेवली आहे. या उद्घाटन प्रसंगी 17 जानेवारी ते 15 फरवरी पर्यंत लकी ड्रॉ कुपन देण्यात येत आहे. किमान 3 हजार रुपये खरेदीवर ही कुपन ग्राहकांना दिली जात आहे. यात दुचाकी, फ्रिज, टीव्ही, पर्स आणि अन्य उपहार ठेवण्यात आले आहेत. येत्या 15 फरवरीनंतर एका भव्य समारंभात ही सोङत काढण्यात येईल. उद्घाटन समारंभाला चंद्रपूरचे आमदार किशोर भाऊ जोरगेवार, महापौर राखी कंचर्लावार, कुवर टिकमचंदचे संचालक पवन सराफ, तपश्या सराफ, नगरसेविका छबूताई वैरागङे, काॅग्रेसचे नेते नंदू नागरकर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्यात.

चंद्रपूर शहरातील ग्राहकांनी मोठ्या संख्येने शोरूमला भेट देऊन दागिन्यांची खरेदी करावी आणि लकी ड्रॉ कुपन घेऊन जावे असे आवाहन ओमजी वर्मा यांनी केले आहे.