वाघाच्या हल्ल्यात धानोराचा संतोष ठार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०४ जानेवारी २०२०

वाघाच्या हल्ल्यात धानोराचा संतोष ठार

 
चंद्रपूर/ प्रतिनिधी 
            
राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन येथून 5 कि.मी.अंतरावरिल धानोरा या गावालगतच जंगलात जनावरे चारण्याकरीता नेणाऱ्या गुराखी संतोष खमोनकार वय 45 वर्षे यांना वाघाने हल्ला करून ठार केले.
                    
चंद्रपूर जिल्हा वाघासाठी प्रसिद्ध आहे. मागील काही दिवसापूर्वी राजुरा येथील इंदिरा नगर लगतच्या जंगलात सरपण गोळा करण्याकरीता गेलेल्या व्यक्तीला वाघाने ठार केले.  ही घटना ताजी असतानाच आज दुपारी एक वाजताच्या दरम्यान संतोष गणपत खामणकर वय 32 रा.धाणोरा येथील गुराख्यांवर वाघाने हल्ला केला. 
संतोष खामणकर हा आपल्या एका सहकार्यासोबत गुरे चारण्याकरीता विरुर वनपरीक्षेत्रातील कविटपेठ कक्ष क्रमांक 137 धानोरा गावालगतच्या वनात गुरे चरायला नेले असता तेथे दबा धरून असलेल्या वाघाने अचानक हल्ला चढवला आणि जागीच संतोषचा जीव गेला. सोबत असलेल्या सहकार्याने धावत येऊन गावकर्‍यांना घटनेची माहिती दिली.