पुन्हा थंडीचा लाट, पावसाची शक्यता - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२० जानेवारी २०२०

पुन्हा थंडीचा लाट, पावसाची शक्यतायेत्या 26 ते 28 जानेवारीदरम्यान राज्यात पुन्हा थंडीचा लाट येणार आहे. त्यामुळे नागरिकांना गुलाबी थंडी अनुभवता येणार आहे.

 विदर्भात मंगळवारी (21 जानेवारी) तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. 

 दरम्यान, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोवा येथे हवामान कोरडे राहील. तसेच मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मंगळवारी आकाश निरभ्र राहील.  आज मुंबईमध्ये 24 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर नवी मुंबईमधील उपनगरांमध्ये 23 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

नाशिकमध्ये 11 अंश सेल्सिअस तापमानामुळे नाशिककर गारठले आहेत. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे. 

 पुण्यात रविवारी पुणे शहरात 12.7, जळगाव 12.7, सातारा 14.3, उस्मानाबाद 13.4 तर औरंगाबाद शहरामध्ये 12.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

हवेचा दर्जा खालावला

दिल्लीप्रमाणेच मुंबईमध्ये  कडाक्याच्या थंडीसह प्रदूषणानातही वाढ झाली आहे. रविवारी मुंबई शहरात तसेच उपनगरात कडाक्याची थंडी जाणवली. मुंबई शहरातील बोरीवली, मालाड, बीकेसी, वरळी, चेंबूर, माझगाव आणि नवी मुंबई येथील  आहे.