पोल्ट्री व्यवसायावर संकट:२ लेअर फार्मला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावली नोटीस - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०८ जानेवारी २०२०

पोल्ट्री व्यवसायावर संकट:२ लेअर फार्मला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावली नोटीस

नागपूर/ललित लांजेवार:९१७५९३७९२५ 

कुक्कुटपालन व्यवसायामुळे होणा-या त्रासामुळे नाशिकच्या २ (अंडी देणाऱ्या) लेअर फार्मला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने डिसेंबर २०१९ ला नोटीस बजावली आहे. सदर तक्रारी बाबत या कार्यालयाकडून दि. २७/११/२०१९ रोजी परिसराची पाहणी करण्यात आली.

सदर पाहणीमध्ये प्रथमदर्शनी असे आढळून आले कि, या दोन्ही उदयोगांमुळे परिसरात माशांचा प्रादूर्भाव झालेला असून परिसरात दुर्गंधी जाणवत होती. तसेच या दोन्ही उदयोगांनी प्रदूषण नियंत्रणासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रसिध्द केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार उपाय योजना केलेली नाही. या दोन्ही उदयोगांना मप्रनि मंडळाकडून संमतीपत्र प्रदान केलेले नाही.व या दोन्ही उदयोगांना आपल्या ग्रामपंचायतीने ना हरकत दाखला दिलेला आहे.व याच लेअर फार्मला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस बजावली आहे. 
पोल्ट्रीफीडसाठी संपर्क करा:९१७५९३७९२५ 
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, नवी दिल्ली यांचे पत्र दि. २०/१०/२०१५,मप्रनि मंडळ मुख्यालय मुंबई यांचे पत्र दि. १९/०७/२०१७,पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन यांचे नागरिकांची सनद-२०००,द्वारे नाशिकच्या दोन पोल्ट्री संबंधित लेअर फार्म उदयोगाची प्रदूषणा बाबत तक्रार करण्यात आली होती,

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, नवी दिल्ली यांनी संदर्भीय पत्र क्र. २ अनुसार पोल्ट्री फॉर्म उदयोगामुळे होणा-या प्रदूषण नियंत्रणासाठी मार्गदर्शक तत्वे प्रसिध्द केलेली आहेत. व या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी होणे करिता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने संदर्भीय पत्र क्र. ३ नुसार निर्देशित केलेले आहे.
पोल्ट्रीफीडसाठी संपर्क करा:९१७५९३७९२५ 
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, नवी दिल्ली यांनी प्रकाशित केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार १,००,००० किव्हा त्यापेक्षा जास्त पक्षी असलेल्या पोल्ट्री फॉर्मधारकाने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून संमतीपत्र प्राप्त करुन घेणे गरजेचे आहे, तसेच पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन यांनी प्रसिध्द केलेल्या नागरिकांची सनद २००० अनुसार ग्रामीण भागातील वस्तीमधील हवा, जल, ध्वनी, घनकचरा प्रदूषणा बाबत कार्यबाही संबंधित ग्रामसेवक / तलाठी / तहसिलदार यांचेकडून होणे बाबत नमुद करण्यात आले आहे.
पोल्ट्रीफीडसाठी संपर्क करा:९१७५९३७९२५ 
सदर तक्रारी बाबत या कार्यालयाकडून दि. २७/११/२०१९ रोजी परिसराची पाहणी करण्यात आली, सदर पाहणीमध्ये प्रथमदर्शनी असे आढळून आले को, या दोन्ही उदयोगांमुळे परिसरात माशांचा प्रादूर्भाव झालेला असून परिसरात दुर्गंधी जाणवत होती. तसेच या दोन्ही उदयोगांनी प्रदूषण नियंत्रणासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रसिध्द केलेल्या मार्गदक तत्वानुसार उपाय योजना केलेली नाही. या दोन्ही उदयोगांना मप्रनि मंडळाकडून संमतीपत्र प्रदान केलेले नाही व या दोन्ही उदयोगांना आपल्या ग्रामपंचायतीने ना हरकत दाखला दिलेला आहे.

अंडय़ाच्या दरात झालेली घसरण आणि कच्च्या मालाच्या दरात झालेली एकतर्फी वाढ यामुळे राज्यातील ‘पोल्ट्री’ व्यवसाय सण २०१९ पासून आर्थिक अडचणीत सापडला आहे. औषधे, मिनरल्स, मका, सोयाबीन यांच्या दरात झालेली वाढ ‘पोल्ट्री’ व्यवसायाच्या मुळावर उठली आहे. जानेवारी २०१९ पासून पोल्ट्री खाद्याच्या किमतीत एकूण ३५० रुपयांहून अधिकची वाढ झाली आहे,२०१९ वर्ष सरताच खाद्य कंपन्यांना अजून एकदा आपल्या खाद्याच्या किमतीत ५० ते ६० रुपयाची दरवाढ करावी लागत आहे. कच्या मालाच्या सततची होणारी दरवाढ यामुळे हा व्यवसाय चालवणेही अवघड होणार असल्याची भीती व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे. कुक्‍कुटपालनासाठी आणि दुग्धोत्पादनात ओले-कोरडे पशुखाद्य म्हणून वापरल्या जाणाऱ्या मक्‍याला अळीने लक्ष्य केले.ऊस व ज्वारीवरही तिचा प्रादुर्भाव आढळला आहे.याचा थेट परिणाम कुक्कुटपालन व डेअरी व्यवसायावर थेट परिणाम होत आहे.
पोल्ट्रीफीडसाठी संपर्क करा:९१७५९३७९२५ 
राज्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊन ते प्रतिक्विंटल ३९०० ते ४००० रुपयांपर्यंत गेले आहेत. इराणकडून वाढलेली मागणी, मक्याचे भडकलेले दर आणि मध्य प्रदेशात भावांतर भुगतान योजनेची सांगता यामुळे सोयाबीनचे दर वधारले आहेत.त्यामुळे पोल्ट्री खाद्य बनविणाऱ्या कंपन्यांना देखील खाद्याचे भाव वाढवे लागले,तर दुसरीकडे कर्ज काढून पोल्ट्री फार्म करत असतांना सरकारच्या चुकीच्या नियोजनाचा फटका देखील आता शेती पूरक व्यव्यसायला बसू लागला आहे. 

पोल्ट्री उद्योग सापडला संकटात
१ किलो कोंबडी तयार करण्यासाठी येणारा खर्च व विक्री नंतर मिळणाऱ्या खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने पोल्ट्री उद्योग संकटात सापडला आहे. शेतीपूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालनाचा प्रसार अनेक ठिकाणी झाला आहे. रोख उत्पन्न देणारा व्यवसाय असल्याने अनेक बेरोजगार तरुणांनी कर्ज काढून या व्यवसायासाठी लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून मका,सोयाबीन,डी-ऑईल्ड राईस ब्रान (डीओआरबी), औषधे, मिनरल्स या सर्व प्रकारच्या कच्च्या मालाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. या तुलनेत दुसऱ्या बाजूला अंडय़ाच्या दरात मात्र घसरण झाली आहे. या दुहेरी संकटामुळे हा व्यवसाय सध्या प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून या व्यवसायासाठी लागणाऱ्या मालाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. कोंबडय़ांच्या खाद्यात मिसळला जाणारा ‘डीओआरबी’ या घटकाची तब्बल ५० टक्के दरवाढ झाली आहे. मक्याचे दर वाढत २५ रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. एका बाजूला मक्याचे दर वाढत असताना बाजारात मक्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. 

कोंबडी खाद्यामध्ये मक्याचा वापर मोठय़ा प्रमाणावर करावा लागत असल्याने कोंबडी खाद्य निर्मितीचा उत्पादन खर्च खूपच वाढला असून मक्याच्या टंचाईमुळे त्यात आणखी भर पडत आहे. मक्याची साठेबाजी करुन कृत्रिम टंचाई केली गेली असावी, अशी व्यावसायिकांना शंका असून शासनाने याबाबत साठेबाजांवर कारवाई करून मका रास्त दरात उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.


पोल्ट्री व्यवसायात कोंबड्या मोठ्या झाल्यावरचा विक्री भाव आणि संपूर्ण खाद्य,देखरेख,औषध,यावर केलेला खर्च हा पोल्ट्री व्यवसायिकांना परवडणारा नसल्याने पोल्ट्रीफार्मिंग बंद होण्याच्या स्थितीत आहेत.अश्यातच शेडच्या दुर्गाधीवर मात करत महाराष्ट्रात कुक्कुटपालन पशुखाद्य बनवणारी "न्युट्रीक्राफ्ट" कंपनीने कमी दिवसात जास्त वजन व शेडवर दुर्गंधी होऊन माश्या लागणार नाही. अश्या प्रकारचे खाद्य बनविले आहे. याच कारणामुळे "न्युट्रीक्राफ्ट" कंपनीच्या खाद्याची पोल्ट्री व्यवसायात डिमांड जास्त सुरु आहे. कमी दिवसात जास्त वजन देऊन शेडमधल्या दुर्गंधी पासून मुक्तता मिळून राहिली असल्याचे पोल्ट्रीफार्मर म्हणतात. 

त्यामुळे शासन शेती पूरक व्यवसाय करा व उन्नत शेतकरी बनावयास जरी वाव देत असतील तरी मात्र दुसरीकडे त्यावर व्यवसाय बंद पाडत कारवाई केली जात आहे.या कारवाईमुळे पोल्ट्री व्यवसाईकात धास्ती निर्माण झाली आहे. एकीकडे लाखो व करोडो रुपये लोन घेऊन मोठ मोठे पोल्ट्री उद्योग सुरु केले असतांना त्यांना बंद करण्याचा डाव म्हणजे पोल्ट्री फार्मवर आत्महत्या करण्याची वेळ आहे.