घुग्घुस नगर परिषद स्थापन करा:जिल्हा नियोजन बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांची मागणी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२५ जानेवारी २०२०

घुग्घुस नगर परिषद स्थापन करा:जिल्हा नियोजन बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांची मागणी


चंद्रपूर:
लोकसंख्या लक्षात घेता घुग्घुस येथे नगर परिषद स्थापन करण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी आज शनिवारी आयोजीत जिल्हा नियोजन बैठकीत पालकमंत्री यांना केली.

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेत आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन नियोजन भवन येथे करण्यात आले होते. या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी मतदार संघातील अनेक विषय मांडले यात घुग्घुस नगर परिषदेची स्थापना करण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.

 यावेळी खासदार बाळू धानोरकर यांनीही घुग्घुस नगर परिषदेची गरज असल्याचे पालकमंत्री यांना सांगितले त्यांतर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी तात्काळ दखल घेत घूग्घूस येथे होणा-या ग्रामपंचायतीच्या निवडणूका थांबविण्याचे निर्देश दिले. तसेच यावेळी पालकमंत्री यांनी घुग्घुस नगर परिषदेचा प्रस्ताव घेऊन मुख्यमंत्र्याकडे येण्याचे आमदार जोरगेवार यांना सांगितले. 

त्यामूळे अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेला घुग्घुस नगर परिषदेचा मार्ग सूखर होण्याच्या दिशेने हालचालींना वेग आल्याचे दिसून येत आहे. लोकसंख्या लक्षात घेता घुग्घुस नगर परिषद स्थापन करण्यात यावी अशी मागणी आमदार जोरगेवार यांनी अनेकदा केली आहे. मात्र आता आमदार होताच त्यांनी ही मागणी पूर्णत्वास नेण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु केले आहे .