२६ जानेवारीला चंद्रपुरात उदयपाल वाढई महाराज(वणीकर) यांचा कीर्तनाचा कार्यक्रम - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२३ जानेवारी २०२०

२६ जानेवारीला चंद्रपुरात उदयपाल वाढई महाराज(वणीकर) यांचा कीर्तनाचा कार्यक्रम

२६ जानेवारी ला चंद्रपुरात “भारत माता पूजन” 
कीर्तनाचा कार्यक्रम 
चंद्रपूर/प्रतिनिधी:
दि.२६ जानेवारी २०२० ला ठीक संध्याकाळी ०६.३० वाजता. शहीद भगतसिंग चौक मित्र मंडळ तर्फे “ भारत माता पुजन ” चा कार्यक्रमानिमित्य शहीद भगतसिंग चौक, पठाणपुरा रोड चंद्रपुर येथे सप्त खंजेरीवादक सत्यपाल महाराज यांचे परमशिष्य मा. इंजि.उदयपाल वाढई महाराज(वणीकर) यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. २१ व्या शतकात युवक देशाभिमुख जगला पाहिजे. व सर्व युवकांनी देशाच्या चांगल्या कामात नेहमी अग्रेसर राहावे. व जे काही देशविरोधी कारवाया सुरु आहे त्या सर्वाना चोख उत्तर द्यावे याच उदात्त हेतूने देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात भारत मातेचे पुजन केले जाणार. त्या नंतर सप्त खंजेरीवादक मा. इंजि.उदयपाल वाढई महाराज(वणीकर) यांचा जाहीर प्रबोधनाचा कार्यक्रम सुरु होणार असून.

सर्व नागरिकांनी व युवा वर्गानी या कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहून भारत मातेचे पुजन करावे व जाहीर प्रबोधनाचा लाभ घ्यावा.असे आव्हान शहीद भगतसिंग चौक मित्र मंडळतर्फे करण्यात आले आहे.