सुरक्षा साहित्य पेटी वाटपाच्या नावावर कामगारांचा छळ थांबवा आमदार किशोर जोरगेवार यांचे कामगार आयुक्तांना निर्देश - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२० जानेवारी २०२०

सुरक्षा साहित्य पेटी वाटपाच्या नावावर कामगारांचा छळ थांबवा आमदार किशोर जोरगेवार यांचे कामगार आयुक्तांना निर्देश

चंद्रपूर/प्रतिनिधी:

बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्याच्या पेट्या वाटपाचे काम शासनाच्या वतीने सूरु आहे. मात्र नियोजनाच्या अभावामुळे या प्रक्रियेत पारदर्शकता नसून पेटी वाटपाच्या नावावर कामागारांचा छळ केला जात आहे. आता हे खपवून घेतल्या जाणार नाही असा इशारा आमदार किशोर जोरगेवार यांनी दिला असून कामगारांचा छळ थांबवून योग्य नियोजन करून सन्मान जनकरित्या पेटी वाटप करण्यात यावे असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी कामगार आयुक्तांना दिल्या आहे. 

बांधकाम क्षेत्रातील कामगारांना सक्षम करण्यासाठी कामोपयोगी साहित्याच्या पेटी वाटप करण्याचे काम सुरू आहे. मात्र यात नियोजन नसल्यामुळे साहित्य पेटी घेण्यासाठी आलेल्या कामगारांची चांगलीच गैरसोय होत आहे. दरम्यान आज आमदार किशोर जोरगेवार यांनी साहित्य पेटी वाटप सुरू असलेल्या चांदा क्लब या ठिकाणी भेट देऊन कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी साहित्य पेट्या कमी असल्याने अनेकांना तासन-तास रांगेत उभे राहावे लागत असल्याचे कामगारांनी सांगीतले, तसेच अनेकांना साहित्य पेटी मिळत नसल्यामुळे तीन दिसांपासून परत जावे लागत असल्याचे लक्षात आले. अनेक कामगार तीन दिवसांपासून पेटीच्या प्रतीक्षेत चंद्रपुरात असल्याचेही यावेळी लक्षात आले. यावेळी चांदा क्लब मैदानात जवळपास 800 ते 1000 कामगार 10 तासापासून रांगेत उभे होते हा प्रकार पाहून आमदार किशोर जोरगेवार चांगलेच संतापले. जोरगेवार यांनी सर्व कामगारांना पिण्याच्या पाण्याची सोय करून दिली. यावेळी किशोर जोरगेवार यांनी या कामात पारदर्शकता आणून योग्य नियोजन करण्याच्या सूचना कामगार आयुक्तांना दिल्या. तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या कामागारांच्या सुविधासाठी या पेट्यांचे वाटप तालुका स्तरावर करण्यात यावे अशा सूचनाही आमदार जोरगेवार यांनी दिल्या आहे. योग्य नियोजन केल्याशिवाय साहित्य पेटी वाटप करू नये असेही आ. जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना खडसावुन सांगितले. तसेच साहित्य पेटी वाटपाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची आणि बसण्यासाठी खुर्चीची व्यवस्था करण्यात याव्यात अशा सूचनाही आमदार जोरगेवार यांनी केल्या आहे.