देशहिताच्या कार्यात युवकांनी पुढे यायला पाहिजे: इंजि.उदयपाल महाराज - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२८ जानेवारी २०२०

देशहिताच्या कार्यात युवकांनी पुढे यायला पाहिजे: इंजि.उदयपाल महाराज

सप्त खंजेरी कीर्तनाला नागरीकांचा 
भरघोस प्रतिसाद  


चंद्रपुर/प्रतिनिधी:
२६ जानेवारी २०२० ला शहीद भगतसिंग चौक मित्र मंडळ तर्फे “ भारत माता पुजन ” चा कार्यक्रम निमित्य सप्तखंजेरी वादक इंजि. उदयपाल वाढई (वनिकर) महाराज शहीद भगतसिंग चौक, पठाणपुरा रोड चंद्रपुर येथे संपन्न झाला. कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून सौ. संगीताताई खांडेकर नगरसेवक मनपा, श्री सुभाष कासनगोटटूवार नगरसेवक मनपा, श्री रघुवीर अहिर जिल्हाध्यक्ष कमल स्पोर्टिंग क्लब, चंद्रपूर हे होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातिला भारत माता पूजन करण्यात आले व दिप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर कपिश उजगावकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व भगतसिंग चौक मित्र मंडळाचे कार्याचा अहवाल समस्त जनते समोर ठेवला.
कार्यक्रमात प्रमुख उपस्थित सौ. संगीताताई खांडेकर नगरसेवक मनपा यांनी शहीद भगतसिंग चौक मित्र मंडळ हे वार्डात नेहमी चांगले कार्यक्रम करत असतात त्यांनी नेहमी देशहिताचे कार्य करावे. व आपला वार्ड आपले शहर सुदृढ करण्यात मोलाचे सहकार्य करावे असे   आपल्या मार्गदर्शनात म्हणाले. 


 श्री सुभाष कासनगोटटूवार नगरसेवक मनपा  यांनी युवकांनी ध्येयनिष्ठ असल पाहिजे. व चांगल्या कामात नेहमी अग्रेसर राहिले पाहिजे असे संबोधन करण्यात आले. कमल स्पोर्टिंग क्लब चे जिल्हाध्यक्ष श्री रघुवीर अहिर यांनी युवकांना चांगल्या कामाशी जास्तीत जास्त संख्येने जुडून यशस्वी राहण्यासाठी व भगतसिंग यांचे विचार आत्मपसाथ करण्यासाठी आव्हान केले. 

इंजि. उदयपाल महाराज म्हणाले कि भारत माता पुजन हा कोणत्या धर्माचा  कार्यक्रम नाही आहे हा समाजाचा उत्सव झाला पाहिजे. भारत मातेची सर्वानी पूजा केली केली पाहिजे. भारताचे रक्षण करणे हे कोणत्या एका संघठनेचे काम नाही आहे. हे सर्व धर्माचे काम आहे. कायद्याचे पालन म्हणजेच देशभक्ती आहे. जगात सहिष्णूता ही भारताकडून शिकली पाहिजे. रक्षण करणारी आपली संस्कृती आहे ति आपण सदैव जपली पाहिजे. व सदैव देशभक्ती जागृत ठेवली पाहिजे.व ति आपल्या आचरणातून दाखवली पाहिजे आज आचरनातून देशभक्ती दाखवण्याची अत्यंत गरज आहे. 

ज्या प्रकारे देशात वातावरण खराब होत चालले आहे ते पुढील काळासाठी योग्य नाही आहे. आज जे लोक भारतात रहातात तेच लोक भारताच्या विरोधात नारेबाजी करताना आपल्याला दिसून येतात. असे का होते या प्रश्नावर तरुण  युवा पिढी ने विचार केला पाहिजे व देशाप्रती योग्य प्रेम व्यक्त केले पाहिजे. मोबाईल चा योग्य वापर युवा पिढीने केला पाहिजे. उतरत्या वयात देशभक्ती सामाजिक बांधिलकी दाखविण्यापेक्षा तरुण असताना जो आपले तेज सामर्थ्य दाखवतो तोच खरा युवक मनाला जातो. गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, शिवाजी महाराज, भगतसिंग यांचे विचार आत्मसाथ करण्याचे सांगितले. लग्न, वाढदिवस साध्या पद्धतीने साजरे करून तो पैसा समाजाच्या उपयोगात आणला पाहिजे असे संबोधन केले व अशा देशभक्ती पर कार्यक्रमाचे आयोजन संपूर्ण  चंद्रपूर शहरात चौका-चौकात करण्याचे आव्हान यावेळी उपस्थित नागरिकांना केले. 


व देश सेवा करणे म्हणजे सीमेवर जाऊनच करणे असे नव्हे तर आपले आचरण शुध्द ठेऊन समाजहित जपल्याने सुद्धा देशभक्तीचे प्रकटीकरण करता येते 
कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांनी भारत मातेचे पुजन केले व कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर शेवट राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची गुरु वंदना  नी कार्यक्रमाची सांगता झाली.

या कार्यक्रमात सूत्रसंचालन सुयश खटी यांनी केले. वैयक्तिक गीत तेजस्विनी घरोटे यांनी सादर केले.  आभार प्रदर्शन मयूर घरोटे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी  प्रसाद काटपाटाळ, श्रेयश घरोटे, शरद खनके, प्रसाद घरोटे, अमोल  पिंपळशेंडे, अंकुश पिंपळशेंडे, रवी म्हरसकोल्हे, पलाश घाटे, आदित्य देशपांडे, नकुल चांदेकर, कार्तिक भाकरे, विश्वनाथ तेलंग, बंटी कडते, , इत्यादीनी सहकार्य केले.