अनेक युवकांचा राष्ट्रवादी युवक कांग्रेसमध्ये प्रवेश - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२६ जानेवारी २०२०

अनेक युवकांचा राष्ट्रवादी युवक कांग्रेसमध्ये प्रवेशचंद्रपूर :- आज अनेक पक्षातील युवकांनी राष्ट्रवादी युवक कांग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी युवक कांग्रेस मध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेश केलेल्या श्री अभिनव देशपांडे यांचे सह शहरातील विविध प्रभागातील युवकांनी देखील प्रवेश केला यामध्ये कुणाल ठेंगरे, यश तुंमुलवार, कार्तिक निकोडे, राहुल राखडे, गणेश पोटे, शिवम गेडाम, चैतन्य कापूरकर, रोशन खोब्रागडे, कपिल जोगी, रोहित लुथडे, रोहन नक्कूलवार, रितिक रंगारी, चिराग ठेंगरे, अक्षय गाडगे, तेजा कुंभरे, आशिष गावतुरे, हर्षद उईके, अनिकेत लांजेवार, व्यंकटेश मुक्तलवार, प्रणय बोरूले यांच्यासह इतर युवक होते. सदर कार्यक्रमात पंचायत समिती सदस्य पंकज ढेंगारे, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप रत्नपारखी, संजय ठाकूर, नितीन पिंपळशेंडे, सिहल नगराळे हे पदाधिकारी उपस्थित होते.