ओबीसी, शोषित, वंचितांना संविधानिक हक्क मिळाले पाहिजे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१७ जानेवारी २०२०

ओबीसी, शोषित, वंचितांना संविधानिक हक्क मिळाले पाहिजे
कार्याध्यक्ष बापुसाहेब भुजबळ
चंद्रपूर येथे समता परिषदेची सभा

चंद्रपूर/ प्रतिनिधी
देशात 85 टक्के बहुजन समाज आहे .एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेल्या समाजाचं सत्तेमध्ये ही प्रतिनिधित्व जास्त प्रमाणात असले पाहिजे .समाजातील वंचित शोषित व पीडित घटकांना त्यांचे घटनात्मक अधिकार मिळाले. पाहिजे यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा संघर्ष सुरू आहे. आपल्या हक्कासाठी या लढ्यात बहुजन समाजातील बांधवांनी एकत्र येऊन संघटना मजबूत केली पाहिजे, असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ यांनी चंद्रपूर येथे केले.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद चंद्रपूर च्या वतीने सभेचे आयोजन नुकतेच विठ्ठल मंदिर वार्ड सभागृहात पार पडले. यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना भुजबळ बोलत होते.

प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय सचिव रवि सोनवणे, विभागीय अध्यक्ष प्राध्यापक दिवाकर गमे, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष जगदीश जूनघरी, पूर्व जिल्हाध्यक्ष प्राध्यापक विजय लोनबले, महानगराध्यक्ष राजू साखरकर, वर्धा महिला अध्यक्ष कविता मुंगले, नागपूर महिला अध्यक्ष विद्या बाहेकर, शशिकला गावतुरे, संध्याताई दुधलकर, विजयश्री माटे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

सभेला मार्गदर्शन करताना बापूसाहेब भुजबळ यांनी समता परिषदेचे लढा विशद केला.

समाजातील ओबीसी, शोषित ,वंचित पीडितांना त्यांचे घटनात्मक अधिकार मिळवून देण्यासाठी माननीय छगन भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली लढा सुरू असल्याचे सांगितले. मात्र बहुजनांची चळवळ दडपण्यासाठी राजकीय षडयंत्रातून छगन भुजबळ यांचा प्रभाव कमी करण्याचे प्रयत्न केले गेले. मात्र जे संपले, ते भुजबळ कसले.असे आव्हान करीत बहुजन समाजातील युवकांनी फुले, शाहू, आंबेडकर महापुरुषांचे विचार आत्मसात करावे व समता परिषदेत लढ्यात सामील व्हावे असे आवाहन राष्ट्रीय कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ यांनी केले.

यावेळी विभागीय अध्यक्ष प्राध्यापक दिवाकर गमे यांनी सभेला मार्गदर्शन केले.

ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे, 2021 मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय जनगणनेत ओबीसीची जनगणना झाली पाहिजे. शेतकरी शेतमजुरांना त्यांचे संविधानिक अधिकार मिळाले पाहिजे. जे एन यु मधील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध याप्रसंगी करण्यात आला.

या कार्यक्रमात महानगर,शहर, तालुका, जिल्हा पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करून बापू साहेब यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बापू भुजबळ, रवि सोनवने याचा शाल-श्रीफळ देवून जिल्हा अध्यक्ष जगदीश जुनगरी यांनी सत्कार केला. प्रस्तावना जगदीश जुनगरी यांनी केली. संचलन एडवोकेट सोनुले यांनी केले .तर आभार महानगर अध्यक्ष राजू साखरकर यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने समता परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते.