भाजयुमोतर्फे पाकिस्तान आणि काँगेस सेवादलचा तीव्र निषेध! - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०४ जानेवारी २०२०

भाजयुमोतर्फे पाकिस्तान आणि काँगेस सेवादलचा तीव्र निषेध!नागपूर/ प्रतिनिधी 
आज भाजयुमो नागपूरतर्फे कमाल चौक नागपूर येथे पाकिस्तान मधील नानक साहेब गुरुद्वारामध्ये समाज कंटकद्वारेकेलेल्या दगडफेक बद्दल पाकिस्तानचा झेंडा जाळून आपला रोष व्यक्त केला व तसेच स्वातंत्रवीर सावरकर  यांचा अपमान करण्याऱ्या काँगेस सेवादलचा जाहीर निषेध करण्यात आला. निषेध व्यक्त करण्यासाठी भाजपा नागपूर शहर अध्यक्ष प्रविणजी दटके, भाजपा उत्तर नागपूर मंडळ अध्यक्ष दिलीपजी गौर, नागपूर शहर युवमोर्चाच्या अध्यक्षा सौ. शिवानीताई दाणी वखरे,संघटन महामंत्री भोजराजजी डुंबे, महामंत्री जितेंद्रसिंग ठाकूर, राहुल खंगार,स्थायी समिती सभापती प्रदीप पोहणे, नगरसेवक संजय चावरे,मंडळ अध्यक्ष आलोक पांडे, कमलेश पांडे, दिपांशु लिंगायत, हनी भंडारी, योगी पचपोर, उत्तर नागपूर भाजपा महामंत्री शिवनाथ पांडे,संजय चौधरी, प्रभाकरजी येवले, सरबाजीत सिंग भाटिया, पप्पू बीजवा, हरप्रित सिंग चांडोक, राजेंद्र सिंग बबरा अन्य प्रमुख कार्यकर्ते व मोठ्या प्रमाणात शीख बांधव यावेळी उपस्थित होते.
निषेधाच्या माध्यमातून आज आम्ही पाकिस्तान मधील समाजकंटकांना चेतावणी देण्याचा प्रयत्न केला. या पुढे अश्या प्रकारच्या घटना होऊ नये या करीता पाकिस्तानमधील आमच्या सर्व अल्पसंख्याक बांधवांना भारतात येण्याची विनंती केली. देशात CAA च्या माध्यमातून या सर्वांना समाविष्ट करून घेण्याचे आव्हान यावेळी केंद्र सरकारला करण्यात आले. तसेच काँग्रेस सेवादलाचे कार्यकर्ते ज्यांनी स्वातंत्रवीर सावरकर याच्याबद्दल अपशब्द बोलले याविरोध देखील तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून गुरुद्वारा साहेबचे अध्यक्ष परमजित सिंग वडे व परविंद सिंग वीज यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषण भाजपा नागपूर शहर अध्यक्ष प्रविणजी दटके यांनी केले. भाजयुमो अध्यक्षा शिवानी दाणी वखरे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.