पालेबारसा येथे वार्षीक स्नेहसंमेलन व माजी विद्यार्थी मेळावा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०५ जानेवारी २०२०

पालेबारसा येथे वार्षीक स्नेहसंमेलन व माजी विद्यार्थी मेळावा
निफंद्रा- येथून जवळच असलेल्या इंदिरा गांधी विदयालय तथा कनिष्ठ महाविदयालय पालेबारसा येथे वार्षिक स्नेहसंमेलन व माजी विदयार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात  आले.स्नेहसंमेलनाचे उदघाटन डॉ.केशव शेन्डे,सचिव संत गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ सिंदेवाही यांचे हस्ते व तुकाराम ठिकरे उपसभापती पंचायत समिती सावली यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाले.यावेळी प्रमूख मार्गदर्शक म्हणून डॉ.गंगाधर वाळले अधिव्याख्याता डायसिपीडी चंद्रपूर,प्राचार्य पि.एस.समर्थ.प्राचार्य  रविंद्र कूडकावार निफंद्रा,विलास कावळे सरपंच,निवास बुटोलिया पोलीस पाटील तसेच शिक्षक पालक संघ व शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी  उपस्थित होते.उपस्थित मार्गदर्शकांनी विदयार्थी व पालक यांना मार्गदर्शन केले.

              तीन दिवस चालणा-या  संमेलनात विदयार्थ्याकरीता सांस्कृतीक कार्यक्रम,क्रीडा व बौध्दिक स्पर्धा,आयोजित करण्यात आल्या आहेत तसेच शेवटच्या दिवशी माजी विदयार्थी मेळावा सुदधा आयोजित करण्यात आला आहे.

      कार्यक्रमाचे संचालन शिक्षीका शिला ताजणे तर आभार शिक्षक कावळे यांनी मानले.