YFP च्या नावाने विदर्भातील नवकलावंतांची फसवणूक - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२६ जानेवारी २०२०

YFP च्या नावाने विदर्भातील नवकलावंतांची फसवणूक

ललित लांजेवार/नागपूर:9175937925
विदर्भाची भाषा,देहबोली,संस्कृती, यावर प्रत्येक विदर्भाद्याचे जीवापाड प्रेम आहे.हीच विदर्भाची भाषा पुण्या-मुंबईकडे नेऊन विदर्भीय भाषेमधून लोकांना हसविण्याचे काम यशवंता फिल्म प्रोडक्शन मागील काही वर्षांपासून पुण्या-मुंबईमधून विदर्भातील काही कलावंत करत आहे.


याच YFP न अल्पावधीतच सोशल मीडियावर चांगलेच फॅन बनवले आहे. व विदर्भासह महाराष्ट्रातील लोकांना प्रत्येक पंचवर हसायला भाग पाडले आहे.तर अनेक लोक यांच्या कॉमेडी सिन युट्युब व्हिडिओजचे दिवाने आहेत. हीच संधी साधत सोशल मीडिया पेजवर प्रसिद्ध झालेल्या YFP चॅनेलचा मी हेड असून तुम्हाला सिनेमा व वेब सिरीजमध्ये काम देऊन तुमचे प्रमोशन करत विदर्भातील नवं कलाकारांना गंडा घालण्याचे काम सुरू झालेले आहे.


कलावंत,कलाकार बनण्याचे स्वप्न बघणार्‍या अनेक नव तरुणांना व तरुणींना मी YFP प्रॉडक्शनचा हेड आहे असे सांगून आर्थिक चुना लावत प्रमोशन करण्याच्या नावाखाली पैसे उखडण्याचे काम नागपूर आणि अकोला या दोन जिल्ह्यांमध्ये सुरू असल्याचे निदर्शनास आलेले आहे.


या गंडा घालण्याच्या बातमीनंतर YFP प्रॉडक्शनच्या ऑफिशियल साईटवर व फेसबुक पेजवर असा कुठल्याही प्रकारचा हेड विदर्भात नसल्याचे सांगण्यात आले आहे. अशाप्रकारे फसवणूक करणाऱ्या पासून सावधान राहण्याचा सल्ला देखील YFP समूहाने आपल्या फॅन्स व्हीवर्सला सांगितले आहे.


जर का पुन्हा कुठे YFP च्या नावाने असा फसवणुकीचा प्रयत्न करण्यात आला तर तत्काळ 7387517344 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन YFP समूहामार्फत करण्यात आले आहे.