नागपूर;जन्मदात्या बापानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२१ जानेवारी २०२०

नागपूर;जन्मदात्या बापानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

wadi police साठी इमेज परिणाम
वाडीतील घटना:बाप-लेकीच्या नात्याला काळीमा 

नागपूर : अरूण कराळे:
बाप लेकीचे एक अतूट नाते असतात परंतु या नात्यावरच काळीमा फासणारी घटना शनिवार १८ जानेवारी रोजी वाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडल्याने कोणत्या नात्यावर विश्वास ठेवून मुलींनी समाजात वावरावे यावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊन घटनेनी सर्वत्र खळबळ उडाली आहे.

पोलीस सुत्राच्या माहितीनुसार मध्यप्रदेशातून एक कुटुंब कामाचे शोधात शहरात आले व हातमजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करीत होते. पीडिताची आई कामानिमित्त बाहेरगावी गेली असतांना आरोपी बाप एक भाऊ व दोन बहिणी एकत्रीतपणे घरी झोपले असतांना १८ जानेवारी रोजी मध्यरात्री २ ते ३ वाजताच्या दरम्यान १५ वर्षीय पीडिता बाथरूमसाठी उठली असतांनाच नराधाम बाप तिच्यामागे गेला व तिच्यावर अत्याचार केला तसेच ही गोष्ट कुठे सांगितल्यास तुला व तुझ्या बहीण भावास जीवे मारील अशी धमकी दिली.मुलीने शेजारी राहणाऱ्या आत्याला या कृत्याची माहिती दिली.
आई गावावरुन परतल्यावर पीडितेने व आत्याने आईला जन्मदात्या बापाच्या दुष्कृत्याची माहिती दिली असता तात्काळ आईने वाडी पोलिसांना माहिती दिलीअसता घटनास्थळी वाडी पोलिस स्टेशनचे पोलसउपनिरिक्षक देवीदास चोपडे,पीएसआय अविनाश जाईभाये पोहचले.आरोपीचा शोध घेऊन नराधम आरोपी बापाला अटक केली असून नराधाम बापावर फिर्यादीच्या तक्रारीवरून कलम ३७६, २ (फ), ३७६ पोट कलम ३, सह कलम ४, ६,८, १० बालकांचे लैंगिक अपराधा पासून संरक्षण अधिनियम २०१२, गुन्हा दाखल केला. मंगळवार २१ जानेवारी रोजी आरोपीस न्यायालयात हजर केले असता ७ दिवसाची पीसीआर मागणी केली.