धक्कादायक:वाघाची शिकार करून वाघाचे डोके आणि चारही पंजे घेऊन शिकारी झाले पौबारा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१२ जानेवारी २०२०

धक्कादायक:वाघाची शिकार करून वाघाचे डोके आणि चारही पंजे घेऊन शिकारी झाले पौबारा


चंद्रपूर/ललित लांजेवार:
ब्रह्मपुरी वनविभागातील दक्षिण ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रात मध्ये वाघाची शिकार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.हि घटना शनिवारी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. या शिकारीत मृत वाघाचे डोके आणि चारही पंजे शिकाऱ्यांनी पौबारा केले असून याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे . 

दक्षिण ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रातील भूज उपक्षेत्रातील मुडझा नियतक्षेत्र आहे. तेथे कक्ष क्रमांक ११७९ मध्ये वाघ मृतावस्थेत असल्याचे तेथील महिलेच्या निदर्शनास आले. घटनास्थळी एका गायीचे मृत शव प्राप्त झाले असून पुढील चौकशी करता गायमालक व गुराखी यांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी व तपासणी करण्यास वनविभागाने करीत आहे. 

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण समितीनुसार घटनास्थळाच्या आजूबाजूस पाचशे मीटर परिसरातील संपूर्ण क्षेत्र पुराव्या शोधण्यासाठी तपासून पाहण्यात आले.मृत वाघाच्या अवयवाचे नमुने तपासणीसाठी हेद्राबाद येथील फोरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असून त्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकणार असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. व इतर व्याघ्र संरक्षक प्रतिनिधीच्या उपस्थितीत वाघाचे दहन करण्यात आले.