धक्कादायक:चंद्रपुरात बारावीत शिकत असलेल्या तरुणावर वाढदिवसाच्या दिवशी अत्याचार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२१ जानेवारी २०२०

धक्कादायक:चंद्रपुरात बारावीत शिकत असलेल्या तरुणावर वाढदिवसाच्या दिवशी अत्याचार

मुलाने गळफास घेऊन केली आत्महत्या
१४ जणांना पोलिसांनी केली अटक
चंद्रपूर/ललित लांजेवार:
चंद्रपुरात बारावीत शिकत असलेल्या तरुणावर अत्याचार करणाऱ्या १४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.18 जानेवारीला सेवादल वस्तीगृह येथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांने आत्महत्या केली होती.त्यांनतर पोलिसांनी तपास सुरु केला होता.तपासादरम्यान पोलिसांना सुसाईट नोट आढळून आली. त्यामध्ये अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

या विद्यार्थ्यावर वसतीगृहातील त्याचे सहकारीच त्याचे लैंगिक शोषण करत असल्याचे समोर आले आहे. हा प्रकार मागील 1 वर्षापासून सुरू होता. त्यामुळेच त्या विद्यार्थ्यांने आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 14 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये 11 विद्यार्थी आणि 3 वसतीगृह कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

5 जानेवारीला पीडित विद्यार्थ्याचा वाढदिवस होता. यादिवशी देखील जवळपास 14 जणांनी त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला होता. यामुळेच त्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

मागील एक वर्षांपासून हा प्रकार सुरू होता.या प्रकरणात पोलीस वसतीगृहाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करत आहेत.