वर्धा:आर.एस.एसला आता कुठे गांधी आठवत आहेत: महादेव विद्रोही - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३० जानेवारी २०२०

वर्धा:आर.एस.एसला आता कुठे गांधी आठवत आहेत: महादेव विद्रोही

सेवाग्राम आश्रमासमोर उपवास सत्याग्रह
वर्धा/प्रमोद पानबुडे:
सन 2002 पर्यंत आर एस एस च्या कार्यालयात कधी राष्ट्रीय झेंडा फडकला नाही, आणि कधी महात्मा गांधी ची जयंती साजरी झाली नाही.आताकुठे त्यांना गांधी आठवत आहे. कारण गांधीशिवाय जगात काही चालत नाहिए,जगात भारत देशाला गांधींच्या नावाने ओळखले जाते.

गोडसे अथवा शहाच्या नावाने ओळखले जात नाही अशी टीका सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही यांनी केली आहे. सेवाग्राम आश्रम समोर एन आर सी च्या विरोधात उपोषण सत्याग्रह करण्यात येत आहे.

गांधीवादी कार्यकर्ते तसेच पदाधिकारी या सत्याग्रहात सहभागी झाले आहेत. देशात सर्वत्र सी ए ए आणि एन आर सी ला विरोध होत आहे, महात्मा गांधी यांनी देखील दक्षिण आफ्रिकेत आशा कायद्याना विरोध केला होता, आता या देशात असा कायदा येत आहे त्याचा विरोध आवश्यक आहे.