थकबाकीदार वीज ग्राहकाची महावितरण कर्मचाऱ्यास मारहाण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२४ जानेवारी २०२०

थकबाकीदार वीज ग्राहकाची महावितरण कर्मचाऱ्यास मारहाण

नागपूर/प्रतिनिधी:
थकीत वीज देयकाची वसुली करण्यासाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या थकबाकीदार वीज ग्राहकाच्या विरोधात यशोधरा नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नागसेननगर, पाण्याच्या टाकीजवळ राहणाऱ्या सईदा शकील शेख या वीज ग्राहकाने मागील ६ महिन्यापासून वीज देयकाची रक्कम भरली नव्हती. थकबाकीची रक्कम सुमारे १२ हजार रुपये होती. थकबाकी वसुलीसाठी महावितरणकडून पाठपुरावा सुरु होता. पण वीज ग्राहक त्याला दाद देत नव्हता. महावितरणचे तंत्रज्ञ राजेंद्र मंथनवार हे गुरुवारी थकबाकीची वसुली करण्यासाठी गेले असता वीज ग्राहकाने रक्कम भरण्यास नकार दिला.

 अश्लील भाषेत वीज ग्राहकाच्या मुलाने शिवीगाळ करून महावितरणचे तंत्रज्ञ राजेंद्र मंथनवार यांना मारहाण केली. महावितरणकडून या प्रकरणी यशोधरा नगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांनी वीज ग्राहक सईदा शकील शेख आणि तिच्या मुलाच्या विरोधात भादंवि कलम ३५३,२९४,५०६,३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.