मानेवाडा उपविभागात शुक्रवारी वीज ग्राहकांसाठी मेळावा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२२ जानेवारी २०२०

मानेवाडा उपविभागात शुक्रवारी वीज ग्राहकांसाठी मेळावा


नागपूर/प्रतिनिधी:
महावितरणच्या मानेवाडा उपविभागात येणाऱ्या वीज ग्राहकांची प्रलंबित अधिक तत्परतेने कामे मार्गी लावण्यासाठी शुक्रवार दिनांक २४ जानेवारी रोजी ग्राहक मेळावा आणि संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महावितरणच्या महाल विभागाचे कार्यकारी अभियंता समीर टेकाडे यांनी दिली.

तुकडोजी पुतळा चौकातील मानेवाडा उपविभागीय कार्यालय येथे सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत ग्राहक मेळावा आणि संवाद कार्यक्रम होईल. या कार्यक्रमात रामबाग,चंदन नगर, हनुमान नगर, वंजारी नगर, रघुजी नगर,सोमवारी वसाहत, मानेवाडा, भगवान नगर,रामेश्वरी, बाभुळखेडा, बेस रोड,मनीष नगर, नरेंद्र नगर, श्रीनगर, सावित्रीबाई फुले नगर,विश्वकर्मा नगर, बालाजी नगर,पार्वती नगर,ज्ञानेश्वर नगर,सुयोग्य नगर परिसरातील वीज ग्राहक उपस्थित राहू शकतात.

या ग्राहक मेळावा आणि संवाद कार्यक्रमात वीज ग्राहकांच्या वीज देयक, नवीन वीज जोडणी, नाव बदल, वीज जोडभर वाढवणे, या विषयातील तक्रारींचे निराकरण करण्यात येणार आहे. ग्राहक मेळावा आणि संवाद कार्यक्रमास उपस्थित राहातेवेळी वीज ग्राहकांनी आवश्यक असणारी कागदपत्रे सोबत आणावीत. 

महावितरणच्या मानेवाडा उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता, रामबाग, मानेवाडा, नरेंद्र नगर आणि भगवान नगर शाखा कार्यालयातील सहायक अभियंता आणि लेख विभागातील कर्मचारी या मेळाव्यात वीज ग्राहकांच्या तकरींचे निराकरण करणार आहेत. वीज ग्राहकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता समीर टेकाडे यांनी केले आहे.