संक्रांतीच्या दिवशी नागपुरातील या भागातील वीज पुरवठा राहणार बंद - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१४ जानेवारी २०२०

संक्रांतीच्या दिवशी नागपुरातील या भागातील वीज पुरवठा राहणार बंद


नागपूर/
नागपूर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महानगर पालिकेच्या वतीने एकात्मिक रस्ते विकास योजनेत रस्त्याच्या मधोमध येणाऱ्या वीज वाहिन्या आणि विजेचे खांब स्थानांतरित करण्याचे काम सुरु आहे. या अंतर्गत बुधवार दिनांक १५ जानेवारी रोजी कुकडे ले आऊट, रामेश्वरी, बाभुळखेडा येथील वीज पुरवठा बंद राहणार आहे. सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत कुकडे ले आऊट, रामेश्वरी, सह हावरा पेठ, आंबेडकर ले आऊट, द्वारकापुरी, सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत कौशल्या नगर, बाभुळखेडा, पार्वतीनगर, जोगी नगर, सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत गुज्जर कॉलनी, गायत्री नगर, तुळशीबाग परिसर, व्यकंटेश सिटी, नंदनवन, राजेंद्र नगर, हसनबाग, सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत सोमवारी वसाहत, सक्करदरा परिवार, आयुर्वेदिक ले आऊट येथील वीज पुरवठा बंद राहील.

सकाळी ८ ते १२ या वेळेत गिरीपेठ,दक्षिण अंबाझरी मार्ग, लक्ष्मी नगर, बजाज नगर, माधव नगर, अभ्यंकर नगर, शिवणगाव,भोसले नगर, पंचशील नगर, बिट्टू नगर, फेटरी गाव, येरला, बोथला, चिंचोली, बोरगाव, माहुरझरी, गोरेवाडा, सुराबर्डी, दुर्गंधामण, वडधामणा,, बोरगाव, शिर्डी नगर, पेंढारकर कॉलनी, रेवती नगर, शिवशक्ती नगर, वाडी, अशोक नगर येथील वीज पुरवठा बंद राहील. सकाळी ८ ते ११ या वेळेत प्रगती कॉलनी, उरुवेला कॉलनी, समर्थ नगर,छत्रपती नगर, प्रशांत नगर,हिंदुस्थान कॉलनी, पडोळे ले आऊट, नवनिर्माण सोसायटी, गोपाळ नगर, विद्या विहार, त्रिमूर्ती नगर, गोर्ले ले आऊट, नेलको सोसायटी, पन्नास ले आऊट, मनीष ले आऊट, सकाळी ८ ते १० या वेळेत छोटी धंतोली, अभ्यंकर रोड, सकाळी ७ ते ११ या वेळेत भगवाघर, काचीपुरा, रामदासपेठ येथील वीज पुरवठा देखभाल दुरुस्तीसाठी बंद राहील. सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत महाजन मार्केट, टेम्पल बाजार रोड, धरमपेठ खरे टाऊन, शंकर नगर, चिंच भवन, बहुजन बस्ती, हुडकेश्वर, विठ्ठलवाडी, नरसाळा येथील वीज पुरवठा नवीन कामासाठी बंद राहणार आहे.