‘ते’ पाच बेजबाबदार अधिकारी व शिक्षक निलंबित - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०१ जानेवारी २०२०

‘ते’ पाच बेजबाबदार अधिकारी व शिक्षक निलंबित

school साठी इमेज परिणाम
शाळा पाहणी दौऱ्यात बेजबाबदारपणा 
आढळल्याने प्रशासनाने केली कारवाई
नागपूर/प्रतिनिधी:
नागपूर महानगरपालिकेच्या शाळेतील पाच शिक्षकांना मनपा प्रशासनाने कारवाई करत अखेर निलंबित केले. मंगळवारी ही कारवाई मनपा प्रशासनाद्वारे करण्यात आली. काही दिवसांपूर्वी उपमहापौर मनीषा कोठे, शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे, उपसभापती प्रमोद तभाने यांनी गिट्टीखदान शाळा व एकात्मतानगर शाळेत शाळेचा आकस्मिक पाहणी दौरा केला होता.

पाहणी दौऱ्याप्रसंगी पदाधिकाऱ्यांना शाळेतील शिक्षक बेजबाबदार आढळले असता त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश उपमहापौरांनी दिले होते. मनपा प्रशासनाने या निर्देशाची अंमलबजावणी करत शिक्षण विभागातील निरीक्षक, मुख्याध्यापकासह शिक्षकांना निलंबित केले. यामध्ये गिट्टीखदान मराठी प्रा. शाळेच्या सहा.शिक्षिका रेवती कडू, सहा.शिक्षिका ललिता गावंडे, सहा.शिक्षिका शारदा खंडारे, प्रभारी मुख्याध्यापक देवमन जामगडे, झोनचे शाळा निरीक्षक धनराज दाभेकर या अधिकारी व शिक्षकांचा समावेश आहे.

या पाच अधिकारी व शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आला होता. परंतू या अधिकारी व शिक्षकांनी दिलेली कारणे समाधानकारक नसल्याने विभागाने ही कारवाई केली.

पदाधिकाऱ्यांनी पाहणी दौऱ्याप्रसंगी अनुपस्थित विद्यार्थ्यांची हजेरी दाखवणे, शाळेचा अभ्यासक्रम पूर्ण न करणे, वह्या पुस्तके, व्यवसायमाला यामध्ये ही गोंधळ असणे, पहिल्या सत्राचा निकाल न लावणे अशा प्रकारचे धक्कादायक प्रकार समोर आले होते. या सर्वांवर पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त करत तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.