आज उद्या चंद्रपुरचा पाणी पुरवठा बंद - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२८ जानेवारी २०२०

आज उद्या चंद्रपुरचा पाणी पुरवठा बंद

चंद्रपूर/प्रतिनिधी:
 तुकुम जलशुद्धीकरण केंद्राजवळ ईरई धरणावरुन येणारी पाईप लाईन जाेडणीचे काम सुरु असल्याने बुधवार २९ जानेवारी रोजी चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. पाईप लाईन जाेडणीचे काम मंगळवार पासूनच सुरु असल्याने मंगळवार २८ जानेवारी व बुधवार २९ जानेवारी अश्या दोन्ही दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. सदर पाईप लाईनची लवकरात लवकर जोडणी करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी मनपा कर्मचारी कार्यरत असून शहरातील नागरिकांनी याची नोंद घेण्याचे व सहकार्य करण्याचं आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे