जिल्ह्यातील उद्योग, व्यवसाय बाबत समस्या सोडवण्यासाठी उद्योग विभाग कटिबद्ध:अशोक धर्माधिकारी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२८ जानेवारी २०२०

जिल्ह्यातील उद्योग, व्यवसाय बाबत समस्या सोडवण्यासाठी उद्योग विभाग कटिबद्ध:अशोक धर्माधिकारी

इझ ऑफ डुईंग बिझनेस  रिफॉर्म बाबत एक दिवसीय कार्यशाळा

चंद्रपूर/प्रतिनिधी:
 जिल्ह्यातील उद्योग व्यवसाय नव्याने उभारण्यासाठी येणाऱ्या समस्या व अडचणी व त्यामधून नियोजनात्मक मार्ग निघावा यासाठी मयूर हॉटेल येथील सभागृहात  "इझ ऑफ डुईंग बिझनेस  रिफॉर्म " बाबत एक दिवसीय कार्यशाळा दिनांक 27 जानेवारी रोजी उद्योग सहसंचालक नागपूर विभाग अशोक धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये उद्योगधंद्यांना व्यवसायांना चालना मिळावी व व्यवसाय उभारत असताना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये याविषयीच्या कार्यशाळेला  महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, चंद्रपूर स्वप्निल राठोड,   सल्लागार,  मैत्री, मुंबई (एम.ए.आय.टी.आर.आय - महाराष्ट्र इंडस्ट्री, ट्रेड अॅंड इन्वेस्टमेंट फॅसिलिटेशन सेल) क्रिष्णा कोतवाल, इ.न.वाय चे वरिष्ठ प्रकल्प सल्लागार क्रिती अग्रवाल, उद्योजक जानी तसेच जिल्ह्यातील उद्योजक, सी.ए,आर्किटेक उपस्थित होते.

जिल्ह्यातील उद्योग व्यवसाय बाबत समस्या सोडविण्यासाठी उद्योग विभाग कटिबद्ध आहे असे प्रतिपादन उद्योग सहसंचालक नागपूर विभाग अशोक धर्माधिकारी यांनी केले. जिल्ह्यातील उद्योगांची भरभराट होण्यासाठी अशा प्रकारच्या  कार्यशाळा 22 जिल्ह्यांमध्ये घेण्यात येत आहे.

क्रिती अग्रवाल यांनी मार्गदर्शनात देशातील, महाराष्ट्रातील व आपल्या जिल्ह्यातील उद्योग, व्यवसाय जास्तीत जास्त लोकांनी करावा यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहे. यांच्यामार्फत उद्योग उभारण्यासाठी विविध नियम सोयीस्कर व्हावे व उद्योग उभारतांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी वर्ड बँक असेसमेंट यांच्या मार्फत मूल्यांकन केल्या जाते.  भारताची उद्योगांमधील  मूल्यांकनात 63 वा क्रमांक लागतो.

मैत्री या एक खिडकी पोर्टल विषयी क्रिष्णा कोतवाल यांनी याविषयी मार्गदर्शन केले. या पोर्टलवर सर्वांना सोयिस्कर वापरता यावे व उद्योग,व्यवसाय यासाठी लागणारे कागदपत्रे, प्रक्रिया उपलब्ध आहे. कोणत्याही कार्यालयांमध्ये न जाता या पोर्टलच्या माध्यमातून उद्योग व्यवसायासाठी लागणारी परवानगी व नोंदणी लवकर होण्यास मदत होते.

या कार्यशाळेमध्ये जिल्ह्यातील उद्योजकांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन व आभार महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, चंद्रपूर स्वप्निल राठोड यांनी केले.