TikTok व्हिडिओ बनविण्याच्या नादात जिवंत कुत्र्याला शेपूट पकडून फेकले तलावात - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१२ जानेवारी २०२०

TikTok व्हिडिओ बनविण्याच्या नादात जिवंत कुत्र्याला शेपूट पकडून फेकले तलावात


ललित लांजेवार/चंद्रपूर:
Tik Tok ने सर्वांनाच अक्षरश: वेड लावलं आहे. Tik Tok व्हिडिओ बनवण्यासाठी तरुणाई वेगवेगळ्या कृत्य करत असल्याचं समोर आलं आहे. अनेकांना Tik Tok व्हिडिओ बनविण्याच्या नादात जीव देखील गमवावा लागला आहे. असाच काहीसा किस्सा चंद्रपूर येथे देखील घडला आहे. Tik Tok वर व्हिडिओ बनवण्याचे व्यसन एका तरुणाला चांगलेच महागात पडले, चंद्रपुरात Tik Tok वर व्हिडिओ बनवण्याच्या नादात एका तरुणाने चक्क जिवंत कुत्र्याला तलावात शेपूट पकडून गर गर फिरवत फेकून दिले. 
                    हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होताच चंद्रपूरच्या प्यार फाऊंडेशन नामक संस्थेने या प्रकाराची तक्रार चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथे दिली. या व्हिडीओ मेकरचा शोध घेत पोलिसांनी आरोपीला अटक केली. व त्यांनी आपण केलेला गुन्हा देखील पोलीस स्टेशनमध्ये कबुल केला. या युवकाचे वय शिक्षण व भविष्य बघता व त्याने केलेली चुकी लक्षात घेता प्यार फाऊंडेशन कडून केलेली तक्रार परत घेण्यात आली.

या तरुणाने चंद्रपूरच्या रामाळा तलाव परिसरात झोपलेल्या कुत्र्याच्या पिल्लाला पकडून थेट तलावात फेकले व त्याचाच एक मित्र हा संपूर्ण प्रकार क्यामेर्यात कैद करत होता.त्यानंतर हा व्हिडीओ त्याने Tik Tok वर शेअर देखील केला. या संपूर्ण प्रकरणात प्रकाश चंदनगिरवार वर कारवाई करण्यात आली व त्याने माध्यमांसमोर आपला गुन्हा कबुल करत पुन्हा अश्या प्रकारचे Tik Tok व्हिडीओ बनवणार नसल्याचे सांगितले. तर पाण्यात फेकण्यात आलेला कुत्रा देखील पोहत पोहत तालावाकाठावर आला व त्याचे प्राण वाचाले.