चंद्रपूर:बायको शारीरिक सुखासाठी त्रास देते म्हणून नवऱ्याने केली पोलिसात तक्रार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२३ जानेवारी २०२०

चंद्रपूर:बायको शारीरिक सुखासाठी त्रास देते म्हणून नवऱ्याने केली पोलिसात तक्रार

ललित लांजेवार/चंद्रपूर:

चंद्रपुरात एक विचित्र घटना समोर आली आहे.एका महिलेने आपल्याच पतिकडे वारंवार शरीर सुखाची मागणी केल्याने कंटाळलेल्या पतीने पत्नी विरोधात चक्क पोलिसात तक्रार दाखल केली आहे.


पत्नीला अपेक्षेपेक्षा जास्त शारिरीक सुख हवे. त्यामुळे ती मला त्रास देत आहे, अश्या आशयाची तक्रार या पुरुषाने रामनगर पोलिसात केली आहे.


एरवी महिलांच्या कौटुंबिक वादाच्या अदखलपात्र तक्रारी पोलिस महिला तक्रार निवारण केंद्रात पाठवितात. मात्र, रामनगर पोलीस ठाण्यात एका व्यक्तीने केलेली तक्रार याला अपवाद ठरली आहे. 


तक्रारकर्त्या संबंधित पुरुषाचे पाच वर्षांपूर्वी लग्न झाले. या दाम्पत्याला मुलंही झाली. मात्र, मागील काही महिन्यांपासून पत्नी त्रास देत आहे. पत्नीला अपेक्षेपेक्षा जास्त शारिरीक सुख हवे. त्यामुळे ती मला त्रास देत आहे, अशी तक्रार या पुरुषाने केली आहे. या लेखी तक्रारीवर कोणता गुन्हा दाखल करावा, यासाठी पोलिसांनी कायद्यांच्या पुस्तकांचा पडशा पाडला. मात्र, त्यांनाही गुन्हा दाखल करण्यासाठी योग्य कलमा अद्याप मिळालेल्या नाही.



अखेर हे प्रकरण महिला तक्रार निवारण केंद्राकडे पाठविण्यात आले आहे. विशेष म्हणजे कौटुंबिक वादाच्या तक्रारी या महिला तक्रार निवारण केंद्राकडे पाठविल्या जातात. मात्र, या पुरुषाने केलेली तक्रारीही येथे पाठविण्यात आली आहे. त्यामुळे सध्या या प्रकरणाची संपूर्ण शहरात चर्चा होत आहे. त्या तक्रारीने पोलिसही चक्रावले

विशेष म्हणजे कौटुंबिक वादाचा तक्रारी या महिला तक्रार निवारन केंद्राकडे पाठविल्या जातात. मात्र या पुरूषाने केलेली तक्रारीही येथे पाठविण्यात आली आहे.