चांदागड यूथ फाऊंडेशन तर्फे प्रजासत्ताक दिन साजरा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२६ जानेवारी २०२०

चांदागड यूथ फाऊंडेशन तर्फे प्रजासत्ताक दिन साजरा

चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर येथील चांदागड यूथ फाऊंडेशन तर्फे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला, प्रजासत्ताक दिनाचा अवचित्य साधून न्यु डॉन पब्लिक हायस्कूलमधिल विद्यार्थांना वृक्ष व केक वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

 ह्या वेळी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष मा. इशान नंदनवार, उपाध्यक्ष लिखिल देवतळे, तसेच सचिव लुमिता नागपुरे, रुबिना शेख, शशांक मोहरकर, रौनक कालबोगवार, अमित सोनटक्के, कुणाल डांगे, विवेक पोतदार, किर्ती येरणे, सोम,आकाश येंडे, अॅड शिल्पा, अश्विनी, गौरव ह्यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमा मुळे वाढत्या प्रदूषणा पासून वाचण्या करिता तसेच विद्यार्थ्यांना वृक्ष लागवड करणे गरजेचे असल्याचे सांगत प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी आपला हातभार लागावा ही इच्छा मनात घेऊन सगळ्या कार्यकर्त्यांनी मनापासून काम केले.